weather update : 15 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, नदी नाले एक होणार, घराच्या बाहेर पडू नका, IMD चा हाय अलर्ट
देशातील अनेक राजांमध्ये पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. दक्षिण भारतामध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 15 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
- देशातील अनेक राजांमध्ये पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. दक्षिण भारतामध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- तर दुसरीकडे मात्र उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 15 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, पुडुचेरी, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक अशा 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
- दरम्यान काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात प्रतितास 60 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे.
- महाराष्ट्राबाबत बोलयाचं झाल्यास महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, इतर भागांमध्ये मात्र तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.
Follow Us





