‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’ वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका

| Updated on: Nov 19, 2020 | 1:40 PM

भाजप आमदार  नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

...आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका
Nitesh Rane
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन काळातील वीज बिलात (Electricity bill) कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकावर (Mahavikas Agadhi on the government) जोरदार टीका होत आहे. अशात भाजप आमदार  नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. (bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)

‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार’ अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सगळीकडे अंधारच अंधार झाला की Penguin Gang ची पार्टी सुरू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढलाय. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर नितेश राणेंच्या या ट्वीटला आघाडी सरकार कसं उत्तर देणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे.

नितेश राणेंनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं?
नितेश राणे हे नेहमी ट्वीट करत आघाडी सरकारवर घणाघाती टीका करत असतात. यावेळीही त्यांनी वाढीव वीज बिलावरून ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी चिमटे काढले आहेत. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘या महाविकास आघाडी सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..आणि मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!!!’ (bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)

इतर बातम्या –

वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

(bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)