VIDEO : यवतमाळमधील भाजप आमदाराच्या दोन बायकांनी भर रस्त्यात झिंजा उपटल्या!

यवतमाळ : भाजप आमदार राजू तोडसाम हे नेहमीच काही ना काही कारणामुळे वादात असतात. अनेकदा त्यांचं चर्चेत राहण्याचे विषय राजकीय असतात. मात्र, यावेळी घरगुती भांडणामुळे ते चर्चेत आले आहेत. बरं हे भांडण घरगुती म्हणजे घरात झालं असंही नाही. तर थेट भर रस्त्यावरच घरातलं भांडणं झाल्याने अवघ्या मतदारसंघाला माहिती पडलं. भांडणाचं कारणही असंय की, चर्चा तर […]

VIDEO : यवतमाळमधील भाजप आमदाराच्या दोन बायकांनी भर रस्त्यात झिंजा उपटल्या!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

यवतमाळ : भाजप आमदार राजू तोडसाम हे नेहमीच काही ना काही कारणामुळे वादात असतात. अनेकदा त्यांचं चर्चेत राहण्याचे विषय राजकीय असतात. मात्र, यावेळी घरगुती भांडणामुळे ते चर्चेत आले आहेत. बरं हे भांडण घरगुती म्हणजे घरात झालं असंही नाही. तर थेट भर रस्त्यावरच घरातलं भांडणं झाल्याने अवघ्या मतदारसंघाला माहिती पडलं. भांडणाचं कारणही असंय की, चर्चा तर होणारच.

झालं असं की, आर्णी-केळापूर मतदरासंघातील भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांचं हे भाडण. हे प्रकरण असंय की, आमदार तोडसाम यांची पहिली बायको वेगळी राहते. आपल्याकडे राजू तोडसाम लक्षच देत नाहीत, राहतच नाहीत, असा आरोप पहिल्या बायकोचा आहे. या दोन बायकांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी सुरु झाली.

हा सर्व प्रकार कुठे झाला, तर कबड्डीच्या कार्यक्रमात. आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडामधील वाय पॉईंट येथे कबड्डीचे सामने ठेवण्यात आले होते. कबड्डी राहिली बाजूला. किंबहुना, कबड्डी पाहण्यासाठी आलेले लोक आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांची भांडणं पाहूनच परतली.

आमदार राजू तोडसाम यांच्या समर्थकांनाही पहिल्या बायकोच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे हे भांडणं अधिकच वाढलं. नंतर पोलिस ठाण्यात हे भांडण मिटवणं सुरु होतं. मात्र, बायकांचं भांडणं ते, मिटतंय कसलं!

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.