शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भाजप आमदार थेट पोलिसात, कल्याणच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?

| Updated on: May 30, 2021 | 3:02 PM

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे (BJP MLA Ravindra Chavan police complaint against ShivSena MP Shrikant Shinde)

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भाजप आमदार थेट पोलिसात, कल्याणच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?
खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार रविंद्र चव्हाण यांचे फाईल फोटो
Follow us on

कल्याण (ठाणे) : घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला असताना आता पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणी प्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपमधील वाद पोलीस ठाण्यात पोहचल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते (BJP MLA Ravindra Chavan police complaint against ShivSena MP Shrikant Shinde).

भाजप आमदाराने आधी घनकचरा व्यनस्थापन करावरुन शिवसेनेला घेरलं

कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करुन आयुक्तांच्या विरोधातही टिकेची झोड उठवली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा, असे त्यावर लिहीले होते (BJP MLA Ravindra Chavan police complaint against ShivSena MP Shrikant Shinde).

भाजप आमदार पाणी प्रश्नावरुन शिवसेना विरोधात पोलिसात

आमदार रविंद्र चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टीका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. या दरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी या देखील तिथे उपस्थित होत्या. रविना माळी यांच्या लेटरहेटवर त्यांनी निवेदन दिले आहे.

“27 गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्याला खासदार शिंदे जबाबदार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील”, असे निवेदनात म्हटले आहे.

भाजपची प्रतिक्रिया

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आरोपावर शिवसेना विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “अमृत पाणी पुरवठा योजनेशी भाजप आमदाराचा काही एक संबंध नाही. तरीदेखील चार वेळा या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी भाजपने केवळ नारळ फोडला. नारळ फोडून देखील भोपर गावात पाणी का आले नाही? अखेरीस खासदार श्रीकांत शिंदे यांनी 180 कोटी रुपये खर्चाची ही योजना मंजूर करुन आणली. या योजनेच्या कामात भाजप पदाधिकारी संदीप माळी याने खो घातला आहे. त्यामुळे आम्ही किती सहन करायचे? भाजप आमदार आणि माळी याचा या योजनेशी काही एक संबंध नाही”, असं एकनाथ पाटील म्हणाले.