AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपनेच घनकचरा कर लागू केला, आता त्यांच्याच उलाट्या बोंबा’, डोंबिवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने

घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्याच्या विरोधात डोंबिवलीत भाजपने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष्य करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे (Dispute between ShivSena and BJP on Solid Waste Tax)

'भाजपनेच घनकचरा कर लागू केला, आता त्यांच्याच उलाट्या बोंबा', डोंबिवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने
शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे
| Updated on: May 28, 2021 | 7:33 PM
Share

डोंबिवली (ठाणे) : घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्याच्या विरोधात डोंबिवलीत भाजपने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष्य करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपडून डोंबिवली शहरात काही ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यानंतर आता या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तसेच भाजप आमदार रविंद्र चव्हाण राज्यमंत्री असताना याबाबतचा अध्यादेश लागू झाला होता. तेव्हा रविंद्र चव्हाण कुठे होते? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे घनकचरा कराच्या आकारणीवरुन शिवसेना-भाजपमध्ये राजकीय वाद पेटणार आहे (Dispute between ShivSena and BJP on Solid Waste Tax).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन कर लागू केला आहे. त्याची वसूली महापालिकेने सुरु केली आहे. दिवसाला 2 रुपये याप्रमाणे महिन्याला 60 रुपये आणि वर्षाकाठी एका मालमत्ताधारकास 720 रुपये भरावे लागणार आहेत. या कराच्या वसूलीतून महापालिकेस जवळपास 10 ते 12 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. या कराच्या वसूलीस भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर कर आकारणी प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधून शहरात बॅनरबाजी केली आहे. त्यांच्या बॅनरबाजीला शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दीपेश म्हात्रे यांचा रविंद्र चव्हाण यांना टोला

या कराची आकारणी लागू करण्यासंदर्भात भाजप सरकारने जीआर काढला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री स्वत: आमदार रविंद्र चव्हाण होते. त्यांच्या कार्यकाळात आकारण्यात आलेल्या कराची आकारणी रद्द करण्यासंदर्भात आता भाजप आमदारांना जाग आली आहे. त्यामुळे भाजपने कर आकारणी चुकीची केली असे भाजप आमदारांना म्हणावयाचे आहे का? कर आकारणी भाजपने करायची आणि त्याचा दोष पालकमंत्र्यांन द्यायचा हे कितपत योग्य आहे? असा टोला दीपेश म्हात्रे यांनी लगावला.

रविंद्र चव्हाण यांचं प्रत्युत्तर

दीपेश म्हात्रे यांच्या टीकेला आमदार रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं. कोण काय बोलतं ते मला माहिती नाही. माझा प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना होता. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, हे अपेक्षित आहे. कुणीही प्रश्नावली करत असेल तर त्याचं उत्तर त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या प्रभागातील लोकंच देतील. मला उत्तर द्यायची आवश्यकता नाही, असं प्रत्युत्तर रविंद्र चव्हाण यांनी दिली.

पालकमंत्र्यांशी चर्चा करुन कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करु, शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया

दरम्यान, कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कोरोना काळात जनता आर्थिक विवंचनेत असताना लागू करण्यात आलेला कर अयोग्य आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करुन हा कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे (Dispute between ShivSena and BJP on Solid Waste Tax).

हेही वाचा : केडीएमसीत आता शिवसेनेविरोधात भाजपची पोस्टरबाजी, रविंद्र चव्हाण यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.