Solapur News: PM मोदींवर टीका, भाजप नेता भडकला, शिंदेंच्या शिलेदाराचा बाप काढला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याबद्दल खालच्या भाषेत टिका केली होती. आता सिद्धाराम म्हेत्रे यांच्या या टिकेला भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उत्तर दिले आहे.

Solapur News: PM मोदींवर टीका, भाजप नेता भडकला, शिंदेंच्या शिलेदाराचा बाप काढला!
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 6:34 PM

Solapur Politics:  सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि त्यांचे कट्टर विरोधक तथा शिवसेनेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या भाषणात बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.मोदीचे पैसे आले म्हणून शेतकरी बँकेत पळतात, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याबद्दल खालच्या भाषेत टिका केली होती. आता सिद्धाराम म्हेत्रे यांच्या या टिकेला भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उत्तर दिले आहे.

काय म्हणाले सचिन कल्याणशेट्टी?

Loading...

“मोदीजी किंवा देवेंद्रजी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याच्या प्रयत्न करतात. म्हेत्रे यांनी हे सगळं बोलताना लक्षात ठेवावं की शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कारखाना काढला पण त्यातून शेतकऱ्यांच्या नावाने खोटी कर्ज प्रकरणं केली. शेतकऱ्यांना लखपती योजना सांगून पैसे काढले आणि शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले. आम्ही 2 असो की 4 हजार असो शेतकऱ्यांना मदत करतो. म्हेत्रे तू आणि तुझ्या खानदानाने शेतकऱ्यांचे किती पैसे बुडवले? हिंमत असेल तर शेतकऱ्यांचे किती पैसे द्यायचे आहेत ते व्याजासहित देता येतं काय याचा प्रयत्न कर,” अशा शब्दात कल्याणशेट्टी यांनी सिद्धाराम म्हेत्रेंवर निशाणा साधला आहे.

‘आमच्या नेत्याचा बाप काढायचा नाही..’

तसेच “म्हेत्रे तू स्वतः ह्या शेतकऱ्याचा देणेकरी आहेस, तुझ्याकडे, तुझ्या बापाकडे पैसे असतील तर आधी देणे फेड. नसतील तर तुझा जो राजकीय बाप वर बसला आहे त्याच्याकडून घेऊन फेड. माझ्या नेत्याचा बाप काढायचा नाही, आज दिवाळी असल्याने तोंड खराब करून घेणार नाही. पण इथून पुढे जर म्हेत्रेने असा प्रकार केला तर तू, तुझा बाप, तुझ्या नेत्याचा, पिलावळचा सगळ्यांचा बाप मी काढेन,” अशी खालच्या भाषेत टिकाही आमदार कल्याणशेट्टी यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us