गृहमंत्र्यांवरील आरोपाचा तपास CBI कडे, उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाहीत? राणेंचा हल्लाबोल

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?" असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे. (Narayan Rane Uddhav Thackeray Anil Deshmukh)

गृहमंत्र्यांवरील आरोपाचा तपास CBI कडे, उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाहीत? राणेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे, नारायण राणे
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 2:47 PM

मुंबई : परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणानंतर (Param Bir Singh Letter Bomb)  गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. “या केसशी संबंधित असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?” असा सवाल भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी विचारला आहे. (BJP MP Narayan Rane asks why Uddhav Thackeray doesnt resign as CM after Bombay HC result on Anil Deshmukh)

नारायण राणे काय म्हणाले?

“परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्दल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या सचिन वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?” असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

(Narayan Rane Uddhav Thackeray Anil Deshmukh)

काय आहे प्रकरण?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.

संबंधित बातम्या: 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

देशमुखांवरील आरोपाचा तपास सीबीआयकडे; सरकार निकालपत्राचा अभ्यास करुनच बोलेल: संजय राऊत

परमबीर सिंगांवर कारवाई का नाही?, आघाडी सरकारला कोणत्या शक्ती रोखत आहेत?; निरुपम यांचा सवाल

(BJP MP Narayan Rane asks why Uddhav Thackeray doesnt resign as CM after Bombay HC result on Anil Deshmukh)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.