“केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी हवी असेल तर अर्ज करु शकता!”, निलेश राणेंची दीपक केसरकरांना ऑफर

निलेश राणे दीपक केसरकरांवर भडकले!

केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी हवी असेल तर अर्ज करु शकता!, निलेश राणेंची दीपक केसरकरांना ऑफर
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 9:20 AM

मुंबई : नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. निलेश राणेंनी तर आक्रमक शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

निलेश राणेंचं ट्विट काय?

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय.

हे सुद्धा वाचा

केसरकरांची राणेंवर काय टीका?

दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.

तेलींकडून इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि नव्या निर्णयांमुळे राज्यातील जनता खुश आहे. दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना आवरावं, अशी विनंती भाजप नेते राजन तेली यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजन तेली हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.