AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांचं स्मारक आणि याकूब मेमनच्या कबरीविषयी नितेश राणे म्हणाले….

बाळासाहेबांच्या नावाने मतं मागू नका असं उद्धव ठाकरे शिंदेगटाला वारंवार बजावताना दिसत आहेत. त्यावर नितेश राणेंनी हल्ला चढवला आहे.

बाळासाहेबांचं स्मारक आणि याकूब मेमनच्या कबरीविषयी नितेश राणे म्हणाले....
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 08, 2022 | 4:26 PM
Share

मुंबई : याकुब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण ही प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचं सोडून हे याकूब मेमनची कबर सजवत बसले, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

बाळासाहेबांच्या नावाने मतं मागू नका असं उद्धव ठाकरे शिंदेगटाला वारंवार बजावताना दिसत आहेत. त्यावरही नितेश राणेंनी हल्ला चढवला आहे.

बाळासाहेबांचं स्मारक केलं नाही अन् आता म्हणतात, माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

शिंदेगटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत शाब्दिक हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता निवडणूक लढवा आणि राजकारण करा, असं म्हणत उद्धव ठाकरे शिंदेगटावर टीका करत असतात. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये मोठा हात असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात मोठं वादंग निर्माण झालं आहे. याकूबच्या कबरीचा एक फोटसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. हे सगळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

Follow Us
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?