मनोज कोटक पहाटेपासून प्रचाराच्या रिंगणात, सेना नेते चार हात लांबच!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असून, त्या जागेवरुन भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. कालच म्हणजे 3 एप्रिल रोजीच मनोज कोटक यांना तिकीट जाहीर झालं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पहाटेपासूनच मनोज कोटक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी विद्यमान खासदार किरीट सोमय्या हेही हजर होते. […]

मनोज कोटक पहाटेपासून प्रचाराच्या रिंगणात, सेना नेते चार हात लांबच!
Follow us on

मुंबई : ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असून, त्या जागेवरुन भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. कालच म्हणजे 3 एप्रिल रोजीच मनोज कोटक यांना तिकीट जाहीर झालं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पहाटेपासूनच मनोज कोटक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी विद्यमान खासदार किरीट सोमय्या हेही हजर होते.

ईशान्य मुंबईचे युतीचे उमेदवार मनोज कोटक सूर्योदयापासूनच प्रचाराला लागले आहेत. भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्याही त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले पाहायला मिळाले. मात्र युतीचे अधिकृत उमेदवार असूनही शिवसेनेचे नेते किंवा कार्यकर्ते कोटक यांच्या प्रचारात गैरहजर होते. कोटक यांनी मुलुंड येथील सरदार प्रतापसिंह उद्यानात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना भेटत मतदानासाठी हाक दिली.

तिकीट कापल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, मनोज कोटक डायनॅमिक!

सोमय्यांचं तिकीट कापलं

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपचा ज्या जागेवरुन तिढा कायम होता, त्या ईशान्य मुंबईच्या जागेवरुन अखेर भाजपचा उमेदवार ठरला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून भाजपने उमेदवारी जाहीर केली. मनोज कोटक यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याने, विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डच्चू मिळाला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर आक्रमक टीका करणं किरीट सोमय्यांना भोवलं आहे. शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट झाला आहे.

कोण आहेत मनोज कोटक?

• मनोज कोटक हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत.
• मुंबई महापालिका निवडणुकीत ते मुलुंडमधून निवडून आले आहेत
• मनोज कोटक हे महापालिकेत भाजपचे गटनेते आहेत
• मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात जनसंपर्क आहे
• ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी-अमराठी मतांचा मेळ घालण्यासाठी मनोज कोटक यांचं नाव पुढे

ईशान्य मुंबईतील लढत

दरम्यान, मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्याने आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

किरीट सोमय्यांना राज्यसभेवर पाठवणार?

दरम्यान, भाजपने किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं असलं, तरी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान लोकसभा खासदार सोमय्यांचं तिकीट कापल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचं राज्यसभेत पुनर्वसन करण्याची शक्यता आहे.