अखेर गागाभट्ट आले, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांची टीका

| Updated on: Dec 29, 2019 | 3:35 PM

उद्या 30 जानेवारी सोमवारी ठाकरे सरकारचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. "मंत्रिमंडळ विस्तारासाठी शेवटी गागाभट्ट आले," अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली Prasad lad on Maharashtra Cabinet Expansion आहे.

अखेर गागाभट्ट आले, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांची टीका
Follow us on

रत्नागिरी : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला (Prasad lad on Maharashtra Cabinet Expansion) आहे. उद्या 30 जानेवारी सोमवारी ठाकरे सरकारचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. “मंत्रिमंडळ विस्तारासाठी शेवटी गागाभट्ट आले,” अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. “अभी तो ये झाकी है मथुरा काशी बाकी है. आता कुठे सुरुवात झाली. लोकांना कळेल. काय होतं काय नाही होतं.” असेही लाड (Prasad lad on Maharashtra Cabinet Expansion) यावेळी म्हणाले.

“मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागणार आहेत,” अशी टीका काही दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांनी केली होती. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरल्यानंतर त्यावर प्रसाद लाड यांनी “शेवटी गागाभट्ट आले”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“गेल्या एक महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. सर्व लोकप्रतिनिधींना चांगला अऩुभव आहे. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांचे सर्व सामान्यांचे उपेक्षितांचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यास मदत होईल. तसेच खरोखर गतीमान सरकार काम करेल अशी अपेक्षा आहे. असेही लाड यावेळी (Prasad lad on Maharashtra Cabinet Expansion) म्हणाले.”

“यावेळी नवीन नियुक्त होणाऱ्या सर्व मंत्र्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांचे समन्वय होणं कठीण आहे. अभी तो ये झाकी है मथुरा काशी बाकी है. आता कुठे सुरुवात झाली. लोकांना कळेल. काय होतं काय नाही होतं. अशी टीकाही लाड यांनी केली.”

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागतील : प्रसाद लाड

“येणाऱ्या 2 महिन्यात आपापसातील वाद आणि सत्तेचा उपभोग यातच हे मश्गुल राहणार आहेत. लोकांचं हे काम करणार नाहीत.” असेही ते म्हणाले.

“जनतेने काय चूक केली हे लोकांना समजले आहे. आमच्या शुभेच्छा आहे. जशी वेळ पुढे जाईल, तसं तुमच्या सर्व लक्षात येईल” असेही लाड यावेळी म्हणाले.

“मित्रपक्षांना किंवा घटकपक्षांना मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान दिलेले नाही. त्यामुळे सत्तेसाठी पुन्हा एकदा आपल्या घटक पक्षांना बाजूला ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने काम केलं आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.” असा टोलाही प्रसाद लाड यांनी (Prasad lad on Maharashtra Cabinet Expansion) लगावला.