“माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची, मुख्यमंत्र्यांच्या संवादात लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीही नाही”

| Updated on: May 31, 2021 | 6:47 AM

जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला.  (Pravin Darekar On CM Uddhav Thackeray)

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची, मुख्यमंत्र्यांच्या संवादात लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीही नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल जनतेला संबोधित करताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. (BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray Speech)

लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नाही

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं. मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाही. लसीकरणाच्या संदर्भात टाईम बाऊंड असे काहीही भाष्य केले नाही. कोरोनामुक्त गाव, जिल्हा आणि राज्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला.
कोकणातील चक्रीवादळाग्रस्तांना अद्याप मदत नाही
राज्यातील व्यापारी कामगार संकटात आहेत. त्यांच्याबाबत काही योग्य धोरण राबवित नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा करत नाही? कोकणातील चक्रीवादळात प्रभावित लोकांना अजून मदत मिळालेली नाही? तसेच मदत, रोजगार आणि उपचार याबाबत योग्य धोरण राबवले पाहिजे, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी बोलून जबाबदारी झटकायची
राज्यातील लसीकरणाची स्थिती काय, त्यावर ते काही बोलले नाही. तसेच त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावरही पण बोलण टाळले. एका ठिकाणी कोविड रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटवत आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन वाढवत आहात. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे बोलून जबाबदारी झटकायची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली.  (BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray Speech)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही 67 हजारांहून 24 हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील 15 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.

सर्व आवश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवता येतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

12 वीच्या परीक्षेवर काय निर्णय घेणार? मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी

CM Uddhav Thackeray Speech Highlights : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा