12 वीच्या परीक्षेवर काय निर्णय घेणार? मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

12 वीच्या परीक्षेवर काय निर्णय घेणार? मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे 'ही' मागणी
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 9:57 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांचा निर्णय घेतला. त्यानुसार मुल्यांकन करुन त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्याप्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र, यासाठी देशभरात एक धोरण असावं. म्हणून पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं,” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी बोलत होते (CM Uddhav Thackeray demand to PM Modi on HSC 12th Exam in Maharashtra).

उद्धव ठाकरे म्हणाले, “10 वीच्या परीक्षांबाबतीत आपण निर्णय घेतलाय. यावर्षी 10 वीची परीक्षा न घेता आपण मुल्याकन करुन त्या त्या प्रमाणे पास करणार आहोत. 12 वीचा देखील निर्णय घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षांचाही आपण आढावा घेत आहोत. त्यासाठी काय पद्धत ठरवता येईल ती ठरवून लवकरात लवकर हाही निर्णय घेणार आहोत. बारावीच्या परीक्षेवर पुढचं शिक्षण अवलंबून असतं. यात नीटची, इंजिनियरींगच्या परीक्षेचा समावेश आहे. इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते. त्यासाठी केंद्र सरकारने देखील एक धोरण ठरवायला पाहिजे.”

“ही परिस्थिती संपूर्ण देश नव्हे जग ग्रासून टाकणारी आहे. 100 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती आली होती. त्यानंतर आता ही परिस्थिती आली. याला आपण आज तोंड देतो आहे. ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि पुढील शैक्षणिक गोष्टींवर परिणाम करणार आहेत त्याबाबत पंतप्रधान मोदींनी देशासाठी धोरण ठरवावं अशी विनंती करतो. मी या आधीही ही मागणी केली होती. बोलायचं असेल तर बोलेल, पत्र पाठवायचं असेल तर तेही मोदींना पाठवेल,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“बारावीच्या परीक्षा किंवा इतर परीक्षा ज्यांचे देशात पडसाद उमटणार असतील त्यासाठी देशात एक शैक्षणिक धोरण असायला हवं. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. नाही तर एका राज्यात परीक्षा होईल आणि एकात नाही. यात विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? यात एक समानता असली पाहिजे,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा :

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

CM Uddhav Thackeray Speech Highlights : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray demand to PM Modi on HSC 12th Exam in Maharashtra

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.