राष्ट्रवादीकडे ‘महास्वयम’ असताना शिवसेनेचं ‘महाजॉब’ कशाला? : भाजप

| Updated on: Jul 07, 2020 | 12:04 PM

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्यात 'महास्वयम' या नावानं कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे" असे राम कदम म्हणाले.

राष्ट्रवादीकडे महास्वयम असताना शिवसेनेचं महाजॉब कशाला? : भाजप
Follow us on

मुंबई : शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याने ‘महाजॉब’ पोर्टलचं उद्घाटन केलं, मात्र नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्याचे रोजगार देणारे ‘महास्वयम’ पोर्टल आधीपासून अस्तित्वात आहे. हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव आहे का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे. (BJP Ram Kadam Criticizes Mahajob Portal claiming lack of coordination in Shivsena NCP)

“शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ‘महाजॉब’ नावाचं पोर्टल कोट्यवधी रुपये खर्च करुन बनवलं. परंतु अशा स्वरुपाचं पोर्टल राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्यात ‘महास्वयम’ या नावानं कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे” असे राम कदम म्हणाले.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“आता हा प्रश्न निर्माण होतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे? की आपसातील भांडण? की तरुणांना जॉब मिळाल्यावर दोन्ही पक्षांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न? पोर्टलच्या निमित्ताने कुणाचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न आहे? महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचे नेमके काय कारण? आमच्या पोलिसांचा कापलेला पगार द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारने याचे उत्तर द्यावे” असे राम कदम म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल आहे. राज्यातील उद्योगात मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कंपन्यांना कशा प्रकारचे कामगार हवेत याची माहिती कंपनी कामगार विभागाला कळवेल. मग त्यानुसार महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना नोकरी मिळेल.

संबंधित बातमी :

उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

(BJP Ram Kadam Criticizes Mahajob Portal claiming lack of coordination in Shivsena NCP)