भाजप 144, शिवसेना 126 आणि उपमुख्यमंत्रीपद, युतीचा फॉर्म्युला ठरला?

| Updated on: Sep 26, 2019 | 8:40 PM

यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना (BJP Shivsena seat sharing formula) सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे.

भाजप 144, शिवसेना 126 आणि उपमुख्यमंत्रीपद, युतीचा फॉर्म्युला ठरला?
Follow us on

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 144, शिवसेना उपमुख्यमंत्रीपदासह 126 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना (BJP Shivsena seat sharing formula) सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण येत्या रविवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे. परंतु सर्वांना खुश करण्यासाठी तितक्या जागाच नसतील, तर काय करायचं, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युती तोडण्याचा मार्ग काढला जाऊ शकतो.

सत्ता आणि जागा 50-50 : संजय राऊत

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) यांच्यातील जागा आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच ठरला आहे. त्यानुसार जागा आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के वाटा सेना-भाजपचा (Shiv Sena BJP) असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

भाजपची दिल्लीत बैठक

राज्यातील उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपची दिल्लीत बैठक मॅरेथॉन बैठक होत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे.