भाजपाची लोकसभा 2024 ची तयारी, ज्यांना पायउतार केलं त्यांची भक्कम फळी बांधण्याची तयारी

| Updated on: Sep 09, 2022 | 9:13 PM

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महेश शर्मा यांना राज्यांची धुरा सोपविण्यात आली आहे.

भाजपाची लोकसभा 2024 ची तयारी, ज्यांना पायउतार केलं त्यांची भक्कम फळी बांधण्याची तयारी
Follow us on

राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलंय. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्र्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महेश शर्मा यांना राज्यांची धुरा सोपविण्यात आली. भाजपनं विजय रुपानी यांना पंजाब आणि बिप्लव देव यांना हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्त केलंय.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी यासंदर्भातील लिस्ट जाहीर केली. त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली. बिहारची जबाबदारी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्याकडं राहील. यापूर्वी तावडे हे हरियाणाचे प्रभारी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू ओम माथूर आहेत. केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी झाल्यानंतर माथूर हे छत्तीसगडची जबाबदारी सांभाळणार आहेत. भाजप छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर सारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छत्तीसगडमध्ये जाणे-येणे असते.

हे सुद्धा वाचा

बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांनाही महत्वपूर्ण पद देण्यात आलं. पक्षानं त्यांना पश्चिम बंगालचा प्रभारी नियुक्त केलं. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप बंगालवर लक्ष केंद्रीत करतेय. मंगल पांडे हे राज्यात सुनील बंसल यांच्यासोबत काम करतील. सुनील बंसल यांना बंगाल आणि तेलंगाणाचा प्रभार सोपविण्यात आलाय.

राजस्थानात अरुण सिंह आणि मध्य प्रदेशात मुरलीधर राव यांना प्रभारी करण्यात आलंय. भाजप राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्तेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करेल. मध्य प्रदेशातही सत्ता शाबूत ठेवण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे.