Sharad Pawar Birthday | विरार का छोरा, करणार परळीचा दौरा!

विशेष म्हणजे यासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा परळीत उपस्थित राहणार आहे. (Actor Govinda Visit Parli For Sharad Pawar Birthday Celebration)

Sharad Pawar Birthday | विरार का छोरा, करणार परळीचा दौरा!
| Updated on: Dec 11, 2020 | 2:33 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या (12 डिसेंबर)ला 80 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 81 किलोचा केक कापणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा परळीत उपस्थित राहणार आहे. (Actor Govinda Visit Parli For Sharad Pawar Birthday Celebration)

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी जय्यत तयारी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोच्या केकची ऑर्डर दिली आहे. अभिनेता गोविंदा याच्या प्रमुख उपस्थितीत हा केक कापला जाणार आहे.

गोविंदा हा सध्या विरारमध्ये वास्तव्यास आहे. मात्र या कार्यक्रमासाठी तो खास परळीत जाणार आहे. त्यामुळे परळीत जय्यत तयारी केली जात आहे. धनंजय मुंडेंकडून अशा अनोख्या प्रकारे शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

गरजूंसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

तर दुसरीकडे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे.

दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन्ही वेबसाईटवर गरजूंनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय यावर नोकरी देणाऱ्यांनीही नोंदणी करावी, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हा स्तरावर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविणार आहेत. त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिरांचे आयोजन 

दरम्यान, राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तादान शिबिरांचेही आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. एकीकडे शरद पवारांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र शरद पवार हे ऑनलाईन वाढदिवस साजरा करणार आहेत. (Actor Govinda Visit Parli For Sharad Pawar Birthday Celebration)

संबंधित बातम्या : 

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?