UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?

यूपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वीकारणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र या चर्चेत कोणतंही तथ्य नाही, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. (NCP Sharad Pawar On UPA chairperson)

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची वर्षभरात चांगलीच गट्टी जमली. राष्ट्रीय स्तरावरही विरोधी अश्याच प्रकारे पक्षांशी मोट बांधली जावी, याकरिता सोनिया गांधी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकांना साडेतीन वर्षांचा अवकाश

पुढील लोकसभा निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. म्हणजेच साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. साधारण सहा महिने ते एक वर्ष आधीपासून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु होते. मात्र गेली सहा वर्ष सत्तेपासून दूर राहिलेली काँग्रेस आतापासूनच तयारीला लागलेली दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. 2019 ची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढली गेली. मात्र नवख्या राहुल गांधींचा अनुभवी मोदींसमोर टिकाव लागला नाही आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. यथावकाश राहुल गांधीही अध्यक्षपदावरुन पायउतार झाले. (Congress proposes Sharad Pawar to contest for PM candidature)

शरद पवारच का?

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लान दिसत असल्याची चर्चा होती. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचं बोललं गेलं.

(NCP Sharad Pawar On UPA chairperson)

संबंधित बातम्या

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ?

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI