आदित्य ठाकरेंच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jul 23, 2019 | 2:18 PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray jan ashirwad Yatra) यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा (jan ashirwad rally) काल श्रीरामपूरमध्ये दाखल झाली.

आदित्य ठाकरेंच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल
Follow us on

शिर्डी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray jan ashirwad Yatra) यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा (jan ashirwad rally) काल श्रीरामपूरमध्ये दाखल झाली. श्रीरामपूर शहरात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान काल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र रस्त्यावर विना परवाना मंडप आणि सभा घेतल्याने गुन्हा दाखल झाला आहे. एका बाजूला मंडप आणि दुसऱ्या बाजूला गाड्यांचा ताफा असल्यामुळे रस्ता ठप्प झाला होता. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आदित्य ठाकरेंच्या सभेच्या  आयोजकांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख आणि मंडप व्यवसायिकावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

ही माझी तीर्थयात्रा : आदित्य ठाकरे

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिर्डीतील सभेला संबोधित करताना, ही माझ्यासाठी राजकीय यात्रा नव्हे तर तीर्थयात्रा आहे असं म्हटलं. तसंच पहिल्या टप्यात जनतेनं आशीर्वाद दिले. अनेक ठिकाणी नागरिकांकडून निवेदन प्राप्त झाली, त्यांचे प्रश्न लवकरच सोडवणार आहे, असं आदित्य म्हणाले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरु झालेल्या युवासेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा काल शिर्डीत पहिला टप्पा पूर्ण झाला. आदित्य ठाकरे साईबाबांचे आशीर्वाद घेऊन मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान आदित्य ठाकरेंनी साई समाधीवर भगव्या रंगाची शाल चढवली. त्यानंतर त्यांनी पाद्यपूजाही केली.