Eknath Shinde : केंद्र महाराष्ट्राला भरीव निधी देणार; नीती आयोगाच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

नीती आयोगाची बैठक होती.  केंद्र सरकारकडून राज्याला मोठा निधी मिळणार आहे. या निधीतून राज्यातील विविध विकास प्रकल्प मार्गी लागतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde : केंद्र महाराष्ट्राला भरीव निधी देणार; नीती आयोगाच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Image Credit source: ani
| Updated on: Aug 08, 2022 | 12:49 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून  परतले आहेत. त्यांचा हा दिल्ली दौरा विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत आला. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा झाली. आणि दुसरं म्हणजे नीती आयोगाच्या बैठकीनंतर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेल्या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिसऱ्या रांगेमध्ये होते तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदींच्या शेजारी पहिल्या रांगेत होते. यावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.  जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याने या प्रसंगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. दरम्यान मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नीती आयोगाची बैठक होती.  केंद्र सरकारकडून राज्याला मोठा निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नीती आयोगाची बैठक होती.  केंद्र सरकारकडून राज्याला मोठा निधी मिळणार आहे. या निधीतून राज्यातील विविध विकास प्रकल्प मार्गी लागतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान अब्दुल सत्ता यांच्या मुलींची नावे ही टीईटी घोटाळा प्रकरणात परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत  आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. आज एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर आहेत. ते आमदार संतोष बांगर यांच्यावतीने आयोजित केलेल्या कावड यात्रेला उपस्थित रहाणार आहेत.

टीईटी प्रकरणावर बोलणे टाळले

टीईटी घोटाळा प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी देखील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.