“सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, आता काय बोलणार?”, अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं TET घोटाळ्यात, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

पेडणेकरांची सत्तांरांवर प्रतिक्रिया!

सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, आता काय बोलणार?, अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं TET घोटाळ्यात, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 12:48 PM

मुंबई : माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात (TET Scam) जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींची नावं आहेत. हीनाकौसर अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार यांची नावं या यादीत आहेत. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अश्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काही नाही सांगणार सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. काय सांगायचं काय बोलायचं संपूर्ण जनतेची फसवणूक झाली आहे. ईडी काडी लावून नेत्यांना आत घेतलं गेलं. या सगळ्यांना आता काय बोलायचं सरकार म्हणून काय करत केंद्र काय करत संविधान म्हणून काय सगळी तोडामोड सुरु आहे, असं पेडणेकर म्हणल्या आहेत.

अंबादास दानवे यांनीही सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. “अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं आहे, सत्तार यांच्याकडेच शिक्षण खातं दिलं तर चांगली चौकशी होईल. 8000 उमेदवारांचा घोटाळा समोर आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे या घोटाळ्यात नाव आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. अब्दुल सत्तार यांचा या TET घोटाळ्यात संबंध आहे का याची चौकशी व्हायला हवी.TET चे बोगस प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या संस्थांवर कारवाई व्हायला हवी”, असं दानवे म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

सत्तार काय म्हणाले?

अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. मी जी यादी पाहिली आहे, ती 2019 मधील आहे. माझ्या मुलींनी परीक्षा 2020 मध्ये दिली होती. त्यात त्या अपात्र ठरल्या होत्या. मग या यादीत नाव येण्याचा प्रश्नच नाही. गेल्या चार वर्षांमध्ये जर माझ्या संस्थेकडून या बाबतीत शिक्षण विभागाला एखादे पत्र जरी गेलं असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा, पण जर असं झालं नसेल तर ज्यांनी हे खोटे आरोप लावलेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं सत्तार म्हणालेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.