होय, शिंदे काँग्रेसकडे गेले होते, चव्हाणांच्या गौप्यस्फोटाला खैरेंचा दुजोरा, अडकवलं शिरसाटांना…

चंद्रकांत खैरे म्हणाले, अशोक चव्हाण खरं म्हणाले. त्यापुढेही जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिंदेंनी खूप चकरा मारल्या, हेही मला माहिती आहे.

होय, शिंदे काँग्रेसकडे गेले होते, चव्हाणांच्या गौप्यस्फोटाला खैरेंचा दुजोरा, अडकवलं शिरसाटांना...
Image Credit source: social media
| Updated on: Sep 29, 2022 | 2:46 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः हिंदुत्वासाठी आम्ही युती केल्याचं सांगणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारच्या अजेंड्यावर संशय निर्माण करणारं एक वक्तव्य सध्या राजकारणात चांगलंच गाजतंय. अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय.  महाविकास आघाडीपूर्वी (Mahavikas Aghadi) म्हणजेच युती सरकारमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव घेऊन आलेल्यांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील होते, असं चव्हाण म्हणालेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिलाय. आज त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत खैरे म्हणाले, अशोक चव्हाण खरं म्हणाले. त्यापुढेही जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिंदेंनी खूप चकरा मारल्या, हेही मला माहिती आहे.

ते 10 ते 15आमदारांना घेऊन गेले होते, असं आमचे त्यावेळचे मित्र संजय शिरसाट यांनी सांगितल्याचं खैरेंनी म्हटलं….

पहा खैरे काय म्हणाले?

 हिंदुत्वाचा मुद्दा वेगैरे काही नाही तर त्यांनी सत्ता पिपासू मुद्द्यासाठी त्यांनी आताची युती केली आणि तेव्हाही तेच कारण असल्याचं खैरेंनी म्हटलं…

शिरसाटांना अडकवण्याचा प्रयत्न?

विशेष म्हणजे अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटाला दुजोरा देताना चंद्रकांत खैरेंनी संजय शिरसाट यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळी संजय शिरसाटांचं माझ्याकडे वारंवार येणं जाणं असायचं. त्यांनीच मला एकनाथ शिंदे काँग्रेसकडे गेल्याचं सांगितलं होतं, अशी आतली माहिती असल्याचं खैरे म्हणाले.

अशोक चव्हाणांनी युती सरकारच्या काळातील या घटनेचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मविआ सरकारच्या आधीपासूनच शिवसेनेनं ही खेळी सुरु केली होती का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाणांची एक क्लिप जाहीर केली तर सगळंच अडचणीत येईल, असं शेलार म्हणालेत.

चव्हाण आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांची अडचण करणार नाहीत. राजकीय परंपरा आम्ही भंग करू इच्छित नाहीत, असा सूचक इशाराही शेलारांनी दिला.