जीएसटीची परतावा दिलाय, आता तरी केंद्रावर खापर फोडू नका, जबाबदारी झटकू नका; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला टोला

| Updated on: Feb 23, 2021 | 2:02 AM

प्रत्येक गोष्टींचं खापर केंद्र सरकावर फोडणं बंद करावं, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारलाय

जीएसटीची परतावा दिलाय, आता तरी केंद्रावर खापर फोडू नका, जबाबदारी झटकू नका; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला टोला
Chandrakant Patil
Follow us on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे 11 हजार 519.31 कोटी दिले आहेत. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना आणि राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी. प्रत्येक गोष्टींचं खापर केंद्र सरकावर फोडणं बंद करावं, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारलाय (Chandrakant Patil criticize Ajit Pawar over GST issue).

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीच्या थकबाकीपोटी 27 हजार कोटी येणे बाकी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नुकताच केला होता. प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे आणि जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

केंद्र सरकारकडून जीएसटी पोटी 1 लाख कोटी रुपये वितरित

चंद्रकांत पाटील म्हणाले, “गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या 4 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2020 पासून राज्य व केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी 1 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. अर्थ मंत्रालयाने देशातील 28 राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे 2019-20 मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जीएसटी परताव्याची रक्कम 19 हजार 233 कोटी देण्यात आली आहे.”

आता महाविकास आघाडीने राज्याचा विकास गतीने करुन दाखवावा

“जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही. त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. राज्यातील कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसाठी नुकसान ग्रस्तांना मदतीसाठी निधी देता येत नाही, असा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमी केला होता. देशावर कोरोनोचे संकट असतानाही केंद्र सरकारने 1 लाख कोटीचा जीएसटीचा परतावा देशातील सर्वच राज्यांना दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जीएसटी थकबाकीचे कारण सांगणाऱ्या महाविकास आघाडीने राज्याचा विकास गतीने करुन दाखवावा. जीएसटी थकबाकीचे कारण देऊ नये,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा :

नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानामुळे गजहब, राष्ट्रवादीकडून थेट अटलजींच्या ‘राजधर्माची’ आठवण

सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil criticize Ajit Pawar over GST issue