तिघे एकत्र या नाहीतर चौघे, आम्ही एकटेच पुरेसे; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारवर निशाणा

| Updated on: Dec 01, 2020 | 10:59 PM

महाराष्ट्रात पार पडणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील पुणे पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

तिघे एकत्र या नाहीतर चौघे, आम्ही एकटेच पुरेसे; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारवर निशाणा
Follow us on

सांगली : ‘तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत’ अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला टोला लगावला आहे. इतकंच नाहीतर जागत कोणावर ही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदानाच्या निमित्ताने आले असता बोलत होते. (Chandrakant Patil criticized on mahavikas aghadi and hasan mushrif in sangli)

महाराष्ट्रात पार पडणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील पुणे पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल याठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, राज्यात पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून अत्यंत चांगला उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळाला. म्हणून भाजप 6 च्या 6 जागा चांगल्या मत्ताधीक्क्याने जिंकेल. विधान परिषदेची 66 पैकी सध्या 60 असणाऱ्या आमदारांमध्ये 25 भाजपाची आहेत. त्यामध्ये ही 6 जोडली तर 31 होतील आणि विधान परिषदेत भाजपाचे बहुमत असेल. यावेळी इतर सगळ्यांच्याकडे मिळून 33 असतील असाही विश्वास चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्रात आमचा प्रयत्न चालला आहे. तुम्ही तिघे एकत्र या नाहीतर चौघे एकत्र या. आम्ही तुम्हाला एकटे पुरेसे आहोत असंही यावेळी पाटील म्हणाले. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यानंतर ‘पोल डायरी’ने या निवडणुकीचा एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर केला. यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपच्या (BJP) विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातही भाजपलाच यश मिळेल. तर अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा (Shiv sena) विजय होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. (Chandrakant Patil criticized on mahavikas aghadi and hasan mushrif in sangli)

‘पोल डायरी’ने पुण्यात भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवली असली तरी पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचा 100 टक्के विजय होईलच, अशी खात्री देण्यात आलेली नाही. तर धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एका जागेवरही भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे ‘पोल डायरी’च्या EXIT Poll मध्ये म्हटले आहे. मराठवाडा आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे निकाल पहिल्या फेरीतच स्पष्ट होतील. तर पुणे पदवीधर मतदारसंघात मात्र निकाल स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

इतर बातम्या – 

Photo | पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक, कोरोना पॉझिटिव्ह मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Graduate Constituency Elections LIVE | पदवीधर आणि शिक्षक निवडणूक, कुठे-किती टक्के मतदान?

(Chandrakant Patil criticized on mahavikas aghadi and hasan mushrif in sangli)