ना मेटे, ना खोत, विधान परिषदेसाठी भाजपाकडून घटक पक्षांना ठेंगा का? चंद्रकांत पाटील म्हणतात, राजकारणात स्वल्पविराम असतो!

| Updated on: Jun 08, 2022 | 12:55 PM

घटक पक्षांना पार्टीत योग्य स्थान आहे. यावेळेला सहा जागा निवृत्त झाल्या. विधानसभेतील संख्या 122 वरून 106 झाल्यामुळे चारच मिळतील. पाचव्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशावेळी दोन नावे कमी करताना कसरत असते. शेवटी न्याय देत असताना कोणावर तरी अन्याय होत असतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ना मेटे, ना खोत, विधान परिषदेसाठी भाजपाकडून घटक पक्षांना ठेंगा का? चंद्रकांत पाटील म्हणतात, राजकारणात स्वल्पविराम असतो!
विधान परिषद उमेदवारीविषयी माहिती देताना चंद्रकांत पाटील
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राजकारणात स्वल्पविराम असतो, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारीचे स्वागत तर घटकपक्षांना ठेंगाच दाखवला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पत्ता भाजपाने कट केला, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 20 तारखेला होणाऱ्या दहा विधानपरिषद जागांसाठी पाच उमेदवार केंद्र कार्यालयाने राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घोषित केले आहेत. या पाचही उमेदवारांचे अर्ज आज भरणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय अशा पाच जणांचा यात समावेश आहे. यात विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

‘घटक पक्षांना पार्टीत योग्य स्थान’

घटक पक्षांना पार्टीत योग्य स्थान आहे. यावेळेला सहा जागा निवृत्त झाल्या. विधानसभेतील संख्या 122 वरून 106 झाल्यामुळे चारच मिळतील. पाचव्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशावेळी दोन नावे कमी करताना कसरत असते. शेवटी न्याय देत असताना कोणावर तरी अन्याय होत असतो. त्यामुळे घटक पक्षांना बाजूला ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही, असे ते म्हणाले.

‘आधी दिल्या होत्या जबाबदाऱ्या’

ज्यांना आता तिकीट मिळाले नाही, त्यांना आधी तिकीट मिळाले होते आणि त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्याही दिल्या होत्या. सदाभाऊंना तर मंत्रीपदही दिले होते. राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, स्वल्पविराम असतो. स्वल्पविरामानंतर वाक्य पुन्हा सुरू होत असते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे आता नाही तर नंतर पुन्हा संधी मिळणार असल्याचेच त्यांनी सुचवले आहे.

हे सुद्धा वाचा

घटक पक्षांबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘कोरी पाकिटे असतो’

पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही, यावर ते म्हणाले, की पक्षात आम्ही सर्व कोरी पाकिटे असतो. जो पत्ता लिहील तिथे जात असतो. त्यामुळे राजकारणात त्याच्या चाहत्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना करत असते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांविषयी ते म्हणाले, की भाजपातील नाराजी ही पाण्यातील नाराजी ही जहाजाला क्रेनने उचलल्यानंतर जो खड्डा पडतो, तो जसा लगेच भरून निघतो, तशी आहे, असे ते म्हणाले.