चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान

चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान

सोलापूर :  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खुलं  आव्हान दिलं आहे. जाणता राजांनी चौकात चर्चा करावी, दुष्काळ योजनेची आकडेवारी संदर्भात चर्चा कराण्यास तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर सोडलं.

सरकारने दुष्काळासंदर्भात जी कामं केली आहेत, त्यासंबधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारीसंदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.

सरकारने दुष्काळासंदर्भात जी कामं केली आहेत, त्यासंबधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारी संदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.

काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करुन सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी द्यायची असते. मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी ही आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे. मग या चर्चेसाठी जाणता राजानं यावं किंवा कोणीही यावं. असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं.

शरद पवार यांनी मुंबईतील मतदानानंतर 29 एप्रिलपासून दुष्काळी दौरा सुरु केला होता. सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणी पवारांनी चारा छावण्यांना भेटी दिल्या होत्या.

दुष्काळी आढावा बैठक

दरम्यान चंद्रकांत पाटील आज दुष्काळी आढाव्यानिमित्त सोलापुरात आहेत. त्याआधी त्यांनी काल राज्यातील दुष्काळाच्या परिस्थीचा आढावा घेऊन, पत्रकार परिषदेत माहिती दिली हती.

“सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून, दुष्काळी भागातील मागणी आणि सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्राधान्य क्रमाने पाणी पुरवठा करण्यात येत आहेत. ज्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे, त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गरज भासल्यास रेल्वेने सुद्धा पाणी पुरवठा करु, असं पाटील म्हणाले.

Published On - 3:15 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI