AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना पद मिळालं पण कायदाच ठरणार अडचण? तक्रार केली आता…प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. आता मात्र त्यांच्यापुढे नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांना पद मिळालं पण कायदाच ठरणार अडचण? तक्रार केली आता...प्रकरण काय?
Updated on: Jul 05, 2025 | 6:31 PM
Share

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. आता ठरल्याप्रमाणे या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मात्र ही निवड झालेली असली तरी बळीराजा पॅनेल आणि चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांनी अजित पवार यांनी नियमांच्या कात्रीत पकडण्याचा डाव आखला आहे. एका नियमाचा संदर्भ देत त्यांनी अजित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतले आहेत.

नेमका काय आक्षेप घेतला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या निवडीवर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. ब वर्गातून चेअरमन होता येत नाही असा चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा दावा आहे. त्यामुळे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी केलेल्या या दाव्याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एकदाही कारखान्याला ऊस घातला नाही असाही आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकरी यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीत नेमकं काय घडलं?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चयच त्यांनी केला होता. विशेष म्हणजे मतदानाच्या काही दिवसांआधी अजित पवार यांनी सभा, बैठकांच्या माध्यमातून आमचेच पॅनेल कसे कारखान्याचा विकास, विस्तार करू शकते, असे त्यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चंद्रावर तावरे यांच्या वयाचा सल्ला देत त्यांनी आता निवृत्ती घेण्याचाही सल्ला अजित पवार यांनी दिला होता. तर मी मरेपर्यंत निवडणूक लढवणार आहे, असा पलटवार चंद्रराव तावरे यांनी केला होता. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला चांगलाच रंग आला होता.

निवडणुकीत काय निकाल लागला?

दरम्यान, या निवडणुकीत नीळकंठेश्वर पॅनेल आणि चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांच्या पॅनेलमध्ये प्रमुख लढत झाली. शरद पवार यांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा फक्त एका जागेवर विजय झाला. नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा खिशात घालून ही निवडणूक जिंकली होती. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO
मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO.
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा.
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.