Chandrashekhar Bawankule : आयुष्य बरबाद झालं होतं, गडकरी नसते तर इथपर्यंत पोहोचलो नसतो; अन् चंद्रशेखर बावनकुळे झाले भावूक

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 36 जिल्ह्यांत युवा वॉरियर्स, मोदींचे युवा योद्धे तयार करावेत. 18 ते 25 वयोगटाचे 25 लाख योद्धे तयार करण्याचे टार्गेट 2024 पर्यंत करण्याचे स्वीकारले आहे. युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासोबत काम केले.

Chandrashekhar Bawankule : आयुष्य बरबाद झालं होतं, गडकरी नसते तर इथपर्यंत पोहोचलो नसतो; अन् चंद्रशेखर बावनकुळे झाले भावूक
आयुष्य बरबाद झालं होतं, गडकरी नसते तर इथपर्यंत पोहोचलो नसतो; अन् चंद्रशेखर बावनकुळे झाले भावूकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:41 PM

नागपूर: त्यावेळचे ऊर्जा राज्यमंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी माझ्या घराचे, शेतीचे 45 लाख रुपये अडवून ठेवले होते. तेही नितीन गडकरी यांनी मिळवून दिले. पालकमंत्री म्हणून नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी नेहमीच संरक्षण केलं. एक कक्ष अधिकारी ऐकत नव्हता. तेव्हा कॅबिनेट मंत्री असताना त्या कक्ष अधिकाऱ्याच्या केबनमध्ये जाऊन गडकरींनी काम करून दिलं. सरकार नसतं. गडकरी नसते तर घर आणि शेतीचे पैसे मिळाले नसते. आयुष्य बरबाद झालं होतं. ते चांगलं झालं नसतं. गडकरी होते म्हणून आयुष्य सावरलं. इथपर्यंत पोहोचता आलं, असं सांगतानाच 45 लाख रुपयांमधूनच विकास सुरू झाला. निश्चितपणे तो इतिहास खूप मोठा आहे. जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेत, विरोधी पक्षनेता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस महापौर होते. त्यांनी त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून कसं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं, असं सांगताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे डोळे पाणावले होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना बावनकुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच गडकरी आणि फडणवीस यांनी केलेल्या मदतीचा आवर्जुन उल्लेख केला. 1992 साली छत्रपती सेनेचे काम करत होतो. नितीनजी तेव्हा विधान परिषद सदस्य होते. नितीनजींनी घरी बोलवले. मनोहरराव सुरवसे यांना मी सांगितलं की, गावाच्या पुनर्वसनाचं काम, कोराडी पॉवर प्रोजेक्टमध्ये घरे गेल्याने अनेक प्रश्न होते. ताणतणाव होता. हे सर्व प्रश्न गडकरींना सांगितले आणि त्यांनी हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं, असं बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

निवडून येईल वाटलं नव्हतं

गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा येत होती. त्यावेळी 1995 साली भाजपात आलो. आठ कार्यकर्ते सोबत होते. 1995 ते 1997 या काळात तालुक्याचे उपाध्यक्षपद मिळाले, 97मध्ये नितीन गडकरी पालकमंत्री झाले, तेव्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विधानसभेचं तिकिट मिळालं. वाटलं नव्हतं कधी निवडून येईल असं. अनेक निवडणुका झाल्या. मते वाढली. पक्ष, संघटना, आमदार अशी जबाबदारी त्यावेळी होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून पक्षात काम करण्याची जबाबदारी दिली आणि प्रवास सुरू झाला असं त्यांनी सांगितलं.

97 हजार 386 बूथवर प्रत्येकी 30 नेते तयार करणार

राज्यातील 36 जिल्ह्यांत युवा वॉरियर्स, मोदींचे युवा योद्धे तयार करावेत. 18 ते 25 वयोगटाचे 25 लाख योद्धे तयार करण्याचे टार्गेट 2024 पर्यंत करण्याचे स्वीकारले आहे. युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासोबत काम केले. मुंबई, पुण्यातही सगळ्या मतदारसंघात ही संकल्पना राबवली. ती मागे घेणार नाही. एका बूथवर 30 नेते तयार करायचे आहेत. बूथ अध्यक्षाला 30 नावे पाठ नसतील, तरच बूथ गठीत झाला असे मानणार नाही. 97 हजार 386 बूथवर प्रत्येकी 30 नेते तयार करायचे आहेत. नागपूरमध्ये बूथवर फिरतो आहे. जिल्ह्यातही फिरतो आहे, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.