Shiv Sena v/s Shiv Sena : पुण्यात आज शिवसेना विरुद्ध शिवसेना; आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार

| Updated on: Aug 02, 2022 | 11:25 AM

गेल्या 10 दिवसांपासून आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. शिवाय याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे असताना आज ते पुणे शहरात दाखल होत आहेत. याच पुणे शहरात आ. तानाजी सावंत यांच्या बंडानंतर त्यांचे कार्यालय फोडण्यात आले होते तर घरासमोरच निदर्शनेही करण्यात आली होती. त्यानंतर आज आदित्य ठाकरे पुण्यात येऊन काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Shiv Sena v/s Shiv Sena : पुण्यात आज शिवसेना विरुद्ध शिवसेना; आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत.
Follow us on

पुणे : निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे हे जोर देत आहेत. आतापर्यंत नाशिक, मराठावाड, कोकण आणि आज ते (Pune) पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला आहे त्याच ठिकाणी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका आणि आपण घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे हे पटवून देत आहेत. पण पहिल्यांदाच हे दोघे एकाच दिवशी..एकाच शहारात म्हणजेच पुण्यात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे आ. तानाजी सावंत यांच्या घराच्या पाठीमागेच आदित्य ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे तर मुख्यमंत्री हे नेत्यांच्या भेटीगाठी आणि पुणेकरांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

नागरिकांची निष्ठा कुणावर?

गेल्या 10 दिवसांपासून आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. शिवाय याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे असताना आज ते पुणे शहरात दाखल होत आहेत. याच पुणे शहरात आ. तानाजी सावंत यांच्या बंडानंतर त्यांचे कार्यालय फोडण्यात आले होते तर घरासमोरच निदर्शनेही करण्यात आली होती. त्यानंतर आज आदित्य ठाकरे पुण्यात येऊन काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शहारत दाखल होणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून ते इतर नेत्यांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची निष्ठा कुणावर हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाकरेंच्या निशाण्यावर बंडखोर आमदार

आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत बंडखोर आमदारांवर सडकून टिका केली आहे. शिवाय बंडखोरांबरोबर आता विश्वासघातकी असाही उल्लेख त्यांनी सोमवारी सिंधुदुर्गामध्ये केला होता. त्यामुळे पुण्यात आता ते काय टिका करणार हे पहावे लागणार आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांनी सुरु केलेल्या निष्ठा यात्रेला राज्यभर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुणेकर याला कसा प्रतिसाद देणार हे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एका दिवशी एकाच शहरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुख्यमंत्र्यांचा असा हा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. येथील नागरिकांच्या ते समस्या जाणून घेणार आहेत. तसेच पुणे ग्रामीणच्याही समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर 2019 ला जे उमेदवार दिले होते. त्यांच्याशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांबरोबर आता शिंदे गटाचे संघटन हा उद्देश ठेऊन मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर येत आहेत. शिवाय तानाजी सावंत यांच्या समवेत त्यांची एक तास बैठकही होणार आहे.