Tanaji Sawant : कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार अन् त्यांची ही शेवटची धडपड

तानाजी सावंत यांचा बंडामध्ये सहभाग आणि त्या दरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका पाहता पुणे येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, तोडफोड शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. त्या दरम्यानच्या काळात दोनवेळेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

Tanaji Sawant : कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार अन् त्यांची ही शेवटची धडपड
आरोग्यमंत्री तानाजी सावंतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 10:46 AM

पुणे : शिंदे गट उदयास आला यामध्ये आ. तानाजी सावंत यांचाही मोठा रोल असल्याचे सांगितले जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान आ. तानाजी सावंत यांच्या घराशेजारी आ. आदित्य ठाकरे यांचे देखील शक्तीप्रदर्शन होत आहे. मात्र, त्याने काही फरक पडणार नाही. सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्याच्यावर एकेरी टिकास्त्र केले. शिवाय आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी कार्यालयाची तोडफोड केली त्यांनीही आवकातीमध्ये रहावं..कुणाशी पंगा घेताय हे डोक्यात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कार्यालय शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादीने फोडले

तानाजी सावंत यांचा बंडामध्ये सहभाग आणि त्या दरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका पाहता पुणे येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, तोडफोड शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. त्या दरम्यानच्या काळात दोनवेळेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. शिवाय राज्याच इतर ठिकाणीही तीव्र पडसाद उमटले होते.

शक्ती गेल्यानंतरचे हे शक्तीप्रदर्शन

आज पुणे येथे आदित्य ठाकरेही दाखल होत आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून त्यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे. यावर तानाजी सावंत यांनी मात्र, सडकून टिका केली आहे. शक्ती गेल्यानंतर शक्तीप्रदर्शन करुन काय उपयोग. सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आणि ते आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे अशी टिकाही सावंत यांनी केली.

मुख्यमंत्री आज पुण्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. येथील नागरिकांच्या ते समस्या जाणून घेणार आहेत. तसेच पुणे ग्रामीणच्याही समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर 2019 ला जे उमेदवार दिले होते. त्यांच्याशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांबरोबर आता शिंदे गटाचे संघटन हा उद्देश ठेऊन मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर येत आहेत. शिवाय तानाजी सावंत यांच्या समवेत त्यांची एक तास बैठकही होणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.