बिहार निवडणुकीत नितीश कुमारांना झटका देण्याचं मिशन फत्ते : चिराग पासवान

| Updated on: Nov 11, 2020 | 3:01 PM

निवडणुकीच्या राजकारणात जागांचे महत्त्व असते. त्यात आमची थोडी चूक झाली, अशी प्रतिक्रिया चिराग पासवान यांनी दिली

बिहार निवडणुकीत नितीश कुमारांना झटका देण्याचं मिशन फत्ते : चिराग पासवान
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election 2020) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि जेडीयूला (JDU) झटका द्यायचा होता, ते मिशन फत्ते झालं, अशी प्रतिक्रिया लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी निकालानंतर दिली. काही जण निवडणुकीआधी आमची लायकी काढत होते, त्यांना आम्ही एकट्याने निवडणूक लढवून उत्तर दिलं, अशी चपराकही चिराग पासवान यांनी लगावली. (Chirag Paswan says his mission to give volt to Nitish Kumar and JDU in Bihar Vidhansabha Election 2020 fulfilled)

“बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समाधानकारक आहेत. जे लक्ष्य आम्ही ठेवलं होतं, ते साध्य झालं आहे. भाजपची कामगिरी चांगली राहावी, हे वाटत होतं, ते झालं. जेडीयूला झटका द्यायचा होता तो आम्ही दिला. अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचं नुकसान झालं आहे. आम्हीही जास्त जागा जिंकाव्यात, अशी इच्छा होती. निवडणुकीच्या राजकारणात जिंकून येणाऱ्या जागांचे महत्त्व असते. त्यात आमची थोडी चूक झाली. वडिलांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे प्रचाराकडे थोडे दुर्लक्ष झालं. तेवढा वेळ देऊ शकलो नाही” अशी प्रतिक्रिया चिराग पासवान यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. 25 लाख बिहारवासियांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ला पाठिंबा दिला आहे. 6 टक्क्यांपेक्षा जास्त जनाधार मिळवला आहे. काही जण निवडणुकीआधी आमची लायकी काढत होते, त्यांना आम्ही एकट्याने निवडणूक उत्तर दिलं. संख्येत कमी आहोत. पण आमच्या उमेदवारांना मिळालेली मते बघितलीत तर 2025 साठी आम्हाला हा आधार मिळाला आहे.” असा विश्वास चिराग पासवानांनी व्यक्त केला.

“जेडीयूचे नेते त्यांच्या अपयशाचे खापर माझ्यावर का फोडत आहेत? हेच लोक माझ्याबद्दल म्हणत होते की यांची लायकी काय आहे? यांना जनाधार कुठे आहे? एकट्याने निवडणूक लढवत आहेत, यांचे डिपॉझिट जप्त होईल. मी त्यांना दाखवून दिलं” असंही चिराग म्हणाले.

“माझा जेडीयू आणि नितीशकुमार यांच्यावर विश्वास नाही. मला नाही वाटत की नाले गटार गल्ल्या बनवून विकास होतो. त्यासाठी मोठे व्हिजन ठेवावे लागते. त्यांचे नेतृत्व स्वीकारणे मला अशक्य होतं. मी नीती-सिद्धांताशी तडजोड केली नाही. ज्या आघाडीचे नेते म्हणून ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत, त्यांच्याकडे बहुमत आहे. मी काय करु शकतो? मी निर्णयाला प्रभावित करण्याच्या पोझिशनमध्ये असतो, तर मी माझे मत मांडले असते. पण आता भाजपला निर्णय घ्यायचा आहे, कुणाला मुख्यमंत्री करायचे. पंतप्रधान सक्षम आहेत निर्णय घेण्यासाठी. बिहारच्या हिताचा विचार करुन निर्णय घेतील” असं चिराग पासवान म्हणाले. (Chirag Paswan says his mission to give volt to Nitish Kumar and JDU in Bihar Vidhansabha Election 2020 fulfilled)

“माझा भाजपला फायदा झाला, त्यांच्या जागांवर आमचा पाठिंबा होता. केंद्र आणि राज्याच्या राजकारणात युती-आघाडी समीकरणे वेगळी असतात. इथे आठवले यांचा पक्ष निवडणूक लढवतो. पण आमचा काही आक्षेप नसतो. गुजरातमध्येही नितीशजी निवडणूक लढवतात. माझं आणि माझ्या खासदारांचे पूर्ण समर्थन मोदीजींना असेल” असं चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं.

“गेले दीड वर्षे माझं नितीशकुमार यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांनी संवाद तोडला म्हणून त्यांचं नुकसान झालं. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या जनाधाराच्या मदतीने 2025 च्या निवडणुकीला लोकजनशक्ती पार्टी सामोरे जाईल” असं चिराग पासवान म्हणाले.

संबंधित बातम्या :

नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

(Chirag Paswan says his mission to give volt to Nitish Kumar and JDU in Bihar Vidhansabha Election 2020 fulfilled)