सावध व्हा, पवार तुमचा घात करतील, मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटलांना चुचकारलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बारामती : तुम्ही कितीही त्यांच्या (पवार) पालख्या उचला, तुमचा पराभव अटळ आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रसचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, पवारांनी नेहमीच तुमचा विश्वासघात केला असून, या विधानसभेलाही घात करतील, असेही हार्षवर्धन पाटलांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार कांचन राहुल […]

सावध व्हा, पवार तुमचा घात करतील, मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटलांना चुचकारलं!
Follow us on

बारामती : तुम्ही कितीही त्यांच्या (पवार) पालख्या उचला, तुमचा पराभव अटळ आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रसचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, पवारांनी नेहमीच तुमचा विश्वासघात केला असून, या विधानसभेलाही घात करतील, असेही हार्षवर्धन पाटलांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार राहुल कुल, उत्तम जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

“हर्षवर्धन पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी आता तरी योग्य निर्णय घ्यावा. पवार यांनी तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे, ते यावेळीही  हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेला घात करतील. त्यामुळे तुम्ही आता तरी सावध व्हावे.”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटील यांना आवाहन केले.

“हर्षवर्धन पाटील हे सध्या आघाडीचा धर्म पाळत असून, ते सुप्रिया सुळे यांचे काम करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. कारण लोकसभेला आघाडीची काम करायचे पवारांना साथ द्यायची. मात्र हेच पवार विधानसभेला हर्षवर्धन पाटलांचा घात करतात व त्यांना पाडतात” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली आणि सध्या हर्षवर्धन पाटील हे आघाडी धर्म पाळत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधत पाटील यांना उद्देशून म्हटलं, “हर्षवर्धन पाटील तुम्ही कितीही त्यांच्या पालख्या उचला तुमचा पराभव अटळ आहे.”