विकासाच्या मागे लागताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 22, 2021 | 2:48 PM

पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नकोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. | Uddhav Thackeray

विकासाच्या मागे लागताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबईच्या जवळच्या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सजलाम सुफलाम करायचा आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. (Cm Uddhav Thackeray Nhava-Sheva water supply scheme)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना (Nhava-Sheva water supply scheme) भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

आयोजकांना धन्यवाद, सगळे नियम पाळून कार्यक्रम घेतला

मुख्यमंत्री म्हणाले, “मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्हमधून प्रेमाने आणि हक्काने सुचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे. मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आरोग्याचे काटेकोर नियम पळून हा कार्यक्रम आयोजित केला”.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “पाणी म्हणजे आयुष्य आहे, विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत , उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू ते.”

विकास करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये

“परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नकोय”, असं ते म्हणाले.

वनसंपदा का नष्ट करायची?

प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी सुविधा देऊन उभारावेत वनसंपदा का नष्ट करायची?

कोरोना काळात प्रदुषण कमी

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या. त्या काही महिन्यात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत.

(Cm Uddhav Thackeray Nhava-Sheva water supply scheme)

हे ही वाचा :

धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद, केली ही मोठी घोषणा