धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope letter) यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:35 PM, 22 Feb 2021
धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील जनेतला धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं पत्र लिहिलं आहे. (Health Minister Rajesh Tope wrote letter to people to Maharashtra over Corona )

आपल्याला सामूहिक लढाई लढायचीय…

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्व न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदका सामूहिक लढाई लागणार आहे, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेय.

राजेश टोपेंचे पत्र

मी हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतोय..

राजेश टोपे पत्रात पुढे लिहितात, मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. राज्यातील अनेक भागात गेलो. कोरनोा हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु, कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्यांने गाठलेच. राज्यातील जनतेच्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे, असं टोपे म्हणाले.

समजदार,सवेंदनशील व सहकार्य करणारे लोक…

आरोग्यमंत्र्यांनी पत्रात पुढे, समजदार, संवेदनशील व सहकार्य करारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केल्याचं आपण पाहिले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. एकजुटीनं, एकमतानं, एकनिर्धारानं कोरोनाला हरवुया, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.

राजेश टोपे यांना कोरोना संसर्ग

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 18 फेब्रुवारीला ट्विटरवरुन कोरोना झाल्याची माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असं राजेश टोपे ट्विटरवर म्हणाले आहेत

संबंधित बातम्या 

खडसे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव, रक्षा खडसे पॉझिटिव्ह, एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

(Health Minister Rajesh Tope wrote letter to people to Maharashtra over Corona )