शिवसेनेची भूमिका तीच, सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

| Updated on: Dec 15, 2019 | 8:38 PM

"स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेची भूमिका कालही तीच होती. आजही तीच असेल आणि उद्याही तीच राहिल. यात कुठेही फरक पडणार नाही. सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं?" असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित (CM uddhav thackeray Press conference) केला.

शिवसेनेची भूमिका तीच, सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
Follow us on

नागपूर : “स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेची भूमिका कालही तीच होती. आजही तीच असेल आणि उद्याही तीच राहिल. यात कुठेही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही सावरकरांना मानता. पण सावरकरांनी सांगितलं होतं की सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत देश एक राहिल. त्या सावरकरांच्या मताबद्दल तुम्ही काय केलं?” असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित (CM uddhav thackeray Press conference) केला.

राज्याची उपराजधानी नागपूर येथे उद्यापासून (16 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. ठाकरे सरकारचे म्हणजेच महाविकासआघाडीचे हे पहिलेचं हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व कायदा आणि विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती यावरुन भाजपवर जोरदार टीका (CM uddhav thackeray Press conference) केली.

“सावरकरांची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. आम्हाला अडचणीत आणणाऱ्यांनी मीच हेच विचारु इच्छितो. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतला काही करता येत नसेल. देशात गोंधळ उडावा, लोकांना कायम तणावाखाली ठेवा. चिंतेत ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या. अशी भाजपची निती देशभरात ठरली आहे. अशी शंका येते. आता तुमच्या हातात पाच वर्षे आहेत. त्याआधीही आम्ही तुमच्यासोबत होतो. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पण तो देश तुम्ही एकत्र करणार आहात का? उलट तुम्ही पिडीत अल्पसंख्याक आहे. त्यांना तुम्ही इथे बोलवतात. त्यामुळे तुम्ही सावरकांच्या विचारबद्दल द्रोह करत आहात. अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.”

“केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा डाव आखला आहे,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ 

“शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करायचे असे मी सांगितले होते. त्या दिशेने आमची पावलं पडत आहे. लवकरच जो काही चांगला निर्णय घेणे शक्य असेल तर तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दलचा हा विषय अत्यंत गंभीर आहे. छत्रपतींच्या स्मारकांमध्ये जर काही गडबड घोटाळा किंवा भ्रष्टाचार कोणी केला असेल तर तो अत्यंत निंदाजनक आणि गंभीर प्रकार आहे. मी सरकार म्हणून त्याची माहिती घेणार आहे. जो कोणीही यात गुन्हेगार किंवा दोषी असेल तर त्याची आम्ही नक्कीच कारवाई करु असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जर यात काही काळबेळ असेल तर ते दूर करुन स्मारक उभारु, असेही त्यांनी (CM uddhav thackeray Press conference) सांगितले.”

“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार भिन्न आहेत. पण आम्ही एकत्र येत असताना आम्ही कॉमन मिनिमम प्रोगाम बनवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.”

फडणवीसांवरही टीका

“इतकंच नव्हे तर या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही टीका केली. “काहीजणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधलेले आहोत. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.”

“हे स्थगिती सरकार आहे. सरकारने सगळ्या विकासकामांना स्थगिती दिली या भाजपच्या आरोपावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. मुंबई किंवा राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. रात्री तेथे वृक्षतोड करून सजीवसृष्टी नष्ट करण्यात आल्यानं स्थगिती दिलेली आहे. सरकारने कोणत्या कामांना स्थगिती दिली त्याची यादी त्यांनी द्यावी,” असा चिमटा उद्धव ठाकरे यावेळी (CM uddhav thackeray Press conference) फडणवीसांना काढला.