VIDEO | खुर्चीवर बसा, आपल्या ‘रखुमाई’चंही न ऐकता मुख्यमंत्री ठाकरे विठ्ठलासमोर जमिनीवर बसले

| Updated on: Jul 25, 2021 | 9:19 AM

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला गेले होते.

VIDEO | खुर्चीवर बसा, आपल्या रखुमाईचंही न ऐकता मुख्यमंत्री ठाकरे विठ्ठलासमोर जमिनीवर बसले
उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूज
Follow us on

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला, मात्र तरीही उद्धव यांनी जमिनीवर बसणंच पसंत केलं. महापूजेवेळी उद्धव ठाकरेंच्या साधेपणाचं दर्शन घडवणाऱ्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

नेमकं काय घडलं?

विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे गाभाऱ्यात पोहोचले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं. नार्वेकरांपाठोपाठ पत्नी रश्मी ठाकरे यांनीही पतीला खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. शेजारीच असणारी खुर्ची मिलिंद नार्वेकर यांनी बसण्यासाठी पुढे केली. त्यामुळे आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीवर बसले आणि महापूजेला सुरुवात झाली.

त्यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे जमिनीवर बसले. मुख्यमंत्र्यांसोबत आलेला सुरक्षारक्षकांचा ताफाही जमिनीवरच बसला. महापूजा दिसणार नाही म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे येऊन बसण्यास सांगितले.

“सर्वच जमिनीवर बसलेत मीही बसतो”

“मी खाली बसतो, काही अडचण नाही. खुर्ची नको, ती बाजूला ठेवूयात. मागचे बाकीचे सर्वच जमिनीवर बसलेत मीही बसतो” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमिनीवर बसकण मारली. “हो साहेब बसू शकता” असं पुजारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाले. त्यासोबत मुख्यमंत्री क्षणाचाही विलंब न लावता थेट जमिनीवर बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कृतीतून त्यांचा साधेपणा दिसून आल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ :

मुख्यमंत्र्यांची सपत्नीक महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला गेले होते.

संबंधित बातम्या : 

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

(CM Uddhav Thackeray sits on floor while performing Vitthal Rakhumai Mahapooja at Pandharpur on Ashadhi Ekadashi)