AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadhi Ekadashi 2021 | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली.

Ashadhi Ekadashi 2021 | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
CM uddha thackeray Pandhapur Pooja 1
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 7:15 AM
Share

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

“लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे”

“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरकडे रवाना

आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: ड्रायव्हिंग केली. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले.

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या दाखल झाल्या आहेत. यंदा दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

(Pandharpur Ashadhi Ekadashi 2021 CM Uddhav Thackeray Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.