Abhijeet Dipke: मोठी बातमी! तुम्हाला ठोकू… अभिजीत दीपकेला भाजपकडून थेट धमकी? कुटुंबालाही सोडलं नाही

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेने आज माध्यमांसमोर मोठा खुलासा केला आहे. त्याने भाजपने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच कुटुंबियांना देखील यामध्ये खेचल्याचे म्हटले आहे.

Abhijeet Dipke: मोठी बातमी! तुम्हाला ठोकू... अभिजीत दीपकेला भाजपकडून थेट धमकी? कुटुंबालाही सोडलं नाही
| Updated on: Jul 30, 2026 | 12:24 PM

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी परतला आहे. तेथून त्याने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दीपकेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भाजपकडून थेट धमकी दिल्याचा त्याने सांगितले आहे. तसेच आई-बाबांना देखील घरी जाऊन पाहून घेऊ असे देखील त्याने म्हटले आहे.

काय आहे अभिजीत दीपकेचा आरोप?

माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, त्यांच्या (भाजपच्या) किती ऑफर आल्या आहेत मला. पण मी भाजपमध्ये जाणार नाही. मला जर भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो. मला धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरं आहे नाही तर आंदोलन मागे घ्या. नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही. गोळ्या घालू. ही भाजपची प्रेमाची भाषा आहे. ही संघाची आणि भाजपची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काही तरी करुन टाकू.

“नरेंद्र मोदींच्या तर मी नातवाच्या वयाचा”

पुढे तो म्हणाला, हे त्यांचे प्रेम हेच आहे. आई-बाबांनाही चालू होतं. आई-बाबांचं पाहून घेऊ आम्ही तुमच्या. तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तुम्ही माझ्यावर काय करणार आहे? तुम्ही 30 वर्षांच्या मुलाला नरेंद्र मोदींच्या तर मी नातवाच्या वयाचा आहे. आम्हीत शाह यांच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलांना धमक्या देता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही?

भाजपने आरोप फेटाळले

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अभिजीत दीपकेचे आरोप फेटाळले आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे की भाजपमध्ये प्रवेश करायचा म्हणून धमक्या दिल्या गेल्या. एखादं आंदोलन केलं, त्यांच्या दृष्टीकोनातून ते केलं. आंदोलनाला चेहरा मिळाला. याचा अर्थ वाट्टेल ते बडबड करण्याचा अधिकार हा कुणालाही मिळत नाही. जसं त्याने एक आंदोलन केलं तर ती जबाबदारी अधिक वाढते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणालाही धमक्या द्याव्या लागत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी कराव्या लागत नाहीत. किंबहूना भारतीय जनता पार्टीमधून कोणीतरी ऑफर दिली, या आमच्यामध्ये म्हटलं असंही काही नाही. असं कोणी म्हटलं असलं तरी अधीक नीट सांगायला हवं होतं. पण चेहरा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, नाव मोठं झालं आहे याचा उपयोग करुन भाजपवर टीका करत असेल तर ते जनताही स्वीकारणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us