मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ऐतिहासिक भारत बचाओ आंदोलन

काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज (14 डिसेंबर) भारत बचाव आंदोलनाचे आयोजन केले आहे. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार (Congress Bharat Bachao Aandolan) आहे.

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ऐतिहासिक भारत बचाओ आंदोलन
| Edited By: | Updated on: Dec 14, 2019 | 12:03 PM

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज (14 डिसेंबर) भारत बचाव आंदोलनाचे आयोजन केले आहे. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार (Congress Bharat Bachao Aandolan) आहे. आर्थिक मंदी, शेतकरी विरोधी भूमिका, महिला अत्यााचार, बेरोजगारी आणि संविधानावर केलेल्या हल्ले या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारला घेरणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले आहे. तसेच कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित राहणार असल्याचे बोललं (Congress Bharat Bachao Aandolan) जात आहे.

या आंदोलनात सहभाग होण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. या आंदोलनात काँग्रेस नागरिकत्व सुधारणा विधेयकााच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात या कायद्याला विरोध केला होता. तसेच सोनिया गांधीनी हे विधेयक पास झाले त्या दिवसाला काळा दिवस म्हणून सांगितले होते.

भारत बचाओ आंदोलन ऐतिहासिक असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकार खऱ्या मुद्द्यांवरुन देशाचे लक्ष विचलीत करत आहेत. पण आम्ही या सर्व मुद्द्यांवरुन आंदोलन करत जनतेच्या संपर्कात जाणार आहोत, असंही काँग्रेसने सांगितले.

देशात सध्या आर्थिक मंदी सुरु आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महागाईही वाढत चालली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. पण मोदी सरकार यासाठी काही काम करत नाही. केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी झालेले दिसत आहे. जीडीपीमध्येही घट झाली आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असं काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले.

काँग्रेसच्या भारत बचाओ आंदोलनासाठी उत्तरप्रदेशमदून 40 हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते दिल्लीत आले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत.