काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, कार्यकर्ते संभ्रमात!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM

नांदेड : नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र लोकसभेच्या मतदानाला केवळ महिना उरला असतानाही काँग्रेसकडून नांदेडचा उमेदवार मात्र ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. मोदी लाटेत 80 हजाराच मताधिक्य घेणारे अशोक चव्हाण यावेळेला मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. नांदेड लोकसभेचा मतदारसंघ हा काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. खरंतर इथल्या मतदारांना काँग्रेसने गृहीत […]

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अद्याप उमेदवाराची घोषणा नाही, कार्यकर्ते संभ्रमात!
Follow us on

नांदेड : नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र लोकसभेच्या मतदानाला केवळ महिना उरला असतानाही काँग्रेसकडून नांदेडचा उमेदवार मात्र ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. मोदी लाटेत 80 हजाराच मताधिक्य घेणारे अशोक चव्हाण यावेळेला मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

नांदेड लोकसभेचा मतदारसंघ हा काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. खरंतर इथल्या मतदारांना काँग्रेसने गृहीत धरलंय की काय अशी शंका येते. गेल्या महिन्यात राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवतील अशी एक चर्चा सुरु झाली होती. त्यातून काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे, हे कार्यकर्त्यांना दाखऊन द्यायचे होते. पण राहुल गांधींबाबतचे वृत निराधार होते, हे कालांतराने सिद्ध झाले. तर आता लोकसभेच मतदान एका महिन्यावर आल्याने मुद्दा असा आहे की नांदेड लोकसभा कॉंग्रेसकडून लढवनार तरी कोण?

नांदेड कॉंग्रेस कमीटीने सुरुवातीला अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव दिल्लीकडे पाठवला आहे. दुसरीकडे याच निवडणुकीची तयारी करताना परवा अशोक चव्हाण यांनी महत्वाच्या मुस्लिम व्यक्तीसोबत संवाद साधला. या कार्यक्रमात नांदेडमधून मुस्लिम व्यक्तीला विधानपरिषद किंवा विधानसभेवर अद्याप संधी दिली गेली नाही याकडे लक्ष वेधन्यात आले. तसेच खासदार म्हणून अशोक चव्हाण यांनी मुस्लिमांसाठी विशेष असं काहीच केल नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली. अशोक चव्हाण यांनी पाहू, संधी देऊ म्हणत देगलूर नाक्यावरचा हा कार्यक्रम आटोपला खरा, पण त्यामुळे नांदेडमध्ये आलबेल नाही हे उघड झाले आहे.

दुसरीकडे, बहुजन वंचित आघाडीने यशपाल भींगे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. कासव गतीने भींगे यांनी आपला प्रचार सुरुही केला आहे. वंचित आघाडीची एक विक्रमी सभाही झालीय. यापुढेही वंचितची तयारी जोरात दिसतेय. काही दिवसांपूर्वी नांदेड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी नांदेडची निवडणूक मॅनेज होऊ देणार नाही, अशी भाषा वापरली होती. त्यामुळे एमबीए असलेले अशोक चव्हाण नांदेडबाबत कमालीचे दक्ष झाले आहेत. निवडून येण्यासाठी म्हणून ते स्वतः च उमेदवार राहतील, असा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी प्रचाराला अपुरा वेळ असल्याने कार्यकर्त्यांना कधी एकदा उमेदवारी घोषित होते त्याचीच उत्सुकता आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.