अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा

| Updated on: Jul 24, 2020 | 11:52 AM

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. Balasaheb Thorat on Ashok Chavan

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी कदाचित पेरली असेल, असं थोरात म्हणाले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. (Balasaheb Thorat clarified on Ashok Chavan disappointment )

याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमवर बनलेली आहे. सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. आम्ही पुढे व्यवस्थित काम करु. विरोधी पक्ष त्यांचे आमदार आश्वासक वाटावे यासाठी विरोधी पक्षनेते काम करतात. आम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, मग सरकारमध्ये अडचण येणार नाही”

“अशोक चव्हाण आणि मी भेटतो. आम्ही पक्षात एकत्र आहोत. अशोक चव्हाणांच्या नाराजी ही बातमी कदाचित पेरली असेल. खाते विभाजन हा विषय आहे, पण त्यावर योग्य चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर अजून चांगलं काम होईल”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

अशोक चव्हाण नाराज

राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. (Ashok Chavan upset again)

अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहित धरुन, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वात आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र तसं न झाल्याने अशोक चव्हाण नाराज होणं साहजिक आहे.

(Balasaheb Thorat clarified on Ashok Chavan disappointment )

संबंधित बातम्या 

खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळ बैठकीत, अशोक चव्हाणांना पत्ताच नाही, मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी  

‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त