पहाटे 5 वा. घराबाहेर, प्रणिती शिंदे 5 किमी अनवाणी रुपाभवानीच्या दर्शनाला

| Updated on: Oct 07, 2019 | 10:08 AM

सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या उमदेवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde Rupabhavani) यांनी तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन, रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं.

पहाटे 5 वा. घराबाहेर, प्रणिती शिंदे 5 किमी अनवाणी रुपाभवानीच्या दर्शनाला
Follow us on

सोलापूर : राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येक जण आपल्याआपल्या परीने देवीची उपासना करत आहे. सोलापुरात शहर मध्य विधानसभा (Solapur City central) मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या उमदेवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde Rupabhavani) यांनी तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन, रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं.

सातरस्ता येथील आपल्या निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. भल्या पहाटे पाच वाजता आमदार प्रणिती शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. त्यानंतर 5 किमी पायी जाऊन त्यांनी रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं.

नवरात्रीच्या काळात प्रतीतुळजाभवानी म्हणून रुपभवानी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. तेच औचित्य साधून आमदार प्रणिती शिंदे यांनी रुपभवानी मातेचं दर्शन घेतलं.

तमाम महिलांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी साकडं घातल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

सोलापूरमधील लढत

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना तर युतीकडून शिवसेनेने दिलीप माने यांना तिकीट दिलं आहे. दिलीप माने हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे आजी-माजी काँग्रेस आमदाराची लढत सोलापूरमध्ये होत आहे.