बेरोजगारांना महिन्याला 5 हजार, 80% नोकऱ्या भूमिपुत्रांना, आघाडीचा जाहीरनामा

| Updated on: Oct 07, 2019 | 4:07 PM

शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यासारख्या घोषणा या जाहीरनाम्यात (Congress-NCP manifesto) करण्यात आल्या आहेत.

बेरोजगारांना महिन्याला 5 हजार, 80% नोकऱ्या भूमिपुत्रांना, आघाडीचा जाहीरनामा
Follow us on

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने (Congress-NCP manifesto) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यासारख्या घोषणा या जाहीरनाम्यात (Congress-NCP manifesto) करण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते उपस्थित होते.

महाआघाडी शपथनामा ठळक मुद्दे

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता

शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण

उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा

कामगारांना किमान 21 हजार वेतन

स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ

सर्व महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी

80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देणार

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव

जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार

विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार

निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणार