नाना पटोलेंच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा खुलासा

| Updated on: Jul 03, 2021 | 10:50 AM

काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. (Nana Patole letter has nothing to do with energy department said Nitin Raut)

नाना पटोलेंच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा खुलासा
Nana Patole Nitin Raut
Follow us on

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा आणि स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. (Congress President Nana Patole letter has nothing to do with energy department said Energy Minister Nitin Raut)

नाना पटोलेंच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही

नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाकडून महाजनकोला कोळसा पुरवणाऱ्या कंत्राटावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती गठित करण्यात आली. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

नाना पटोले यांच्या तक्रारीची सुभाष देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यीय समिती गठित केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

(Congress President Nana Patole letter has nothing to do with energy department said Energy Minister Nitin Raut)

संबंधित बातम्या : 

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार: सुभाष देसाई

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

मोठी बातमी: अभिनेता दिनो मोरियावर ‘ईडी’ची कारवाई; सव्वा कोटींची संपत्ती जप्त