AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियातून विरोधकांच्या बदनामीचा ट्रेंड हा नवदहशतवादच; काँग्रेसचा भाजपवर हल्ला

भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली.

सोशल मीडियातून विरोधकांच्या बदनामीचा ट्रेंड हा नवदहशतवादच; काँग्रेसचा भाजपवर हल्ला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 07, 2020 | 6:29 PM
Share

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला आहे (Sachin Sawant Criticize BJP). भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी, अपप्रचाराची मोहीम राबवण्याचा उपद्व्याप सुरु आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समुळ उच्चाटन झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे (Sachin Sawant Criticize BJP).

भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली. या बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खरे आणि फेक अकाऊंटची माहिती आहे. याची चौकशी करु, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे, असे सावंत म्हणाले.

“भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे”, असं सचिन सावंत म्हणाले.

“या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट करु शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला 25 ट्वीट केल्याचे दिसते. हे सर्व ट्वीट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत, ते म्हणजे सुशांतसिंग राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आले आहे”, असं सावंतांनी म्हणाले (Sachin Sawant Criticize BJP).

“मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर गोदी न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात. सुशांतच्या आत्म्याशी बोललो असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत भाजपाचे नेते कृत्रीम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे”, असे सावंत म्हणाले.

“भाजपाच्या या नव दहशतवादाचा काँग्रेसने भांडाफोड करुन यामागील खरा मास्टरमाइंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करुन सोशल मीडियाचे रॅकेट उद्धवस्त करावे, अशी मागणी केली होती. मुंबई पोलिसांनीही तपास करत अशा 80 हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवल्याचे उघड केले आहे. मिशीगन विद्यापीठानेसुद्धा अशा मोहिमेत भाजपाचा हात असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फेसबुक आणि भाजपाच्या अभद्र युतीचा पर्दाफाशही वॉल स्ट्रिट जनरलने उघड केला होता”, असंही ते म्हणाले.

“पालघरमधील दोन साधूंच्या हत्यावेळी, दिल्ली दंगलीतही हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती आणि भविष्यातही अशाच पद्धतीने हे उपद्व्याप करुन समाजात अशांत पसरवली जाऊ शकते, तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो”, अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Sachin Sawant Criticize BJP

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?