Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा

याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता

Harshada Bhirvandekar

|

Oct 03, 2020 | 1:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे कळते आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता (AIIMS forensic panel rules out murder claims in Sushant Singh Rajput Case).

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले.

अहवाल सांगतोय हत्या नव्हे आत्महत्या!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.

एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे. (AIIMS forensic panel rules out murder claims in Sushant Singh Rajput Case)

कूपर रुग्णालयाला क्लीनचीट नाही

एम्सच्या (AIIMS) या रिपोर्टमध्ये आणि सीबीआयच्या तपासणीत तफावत आढळली नाही. मात्र, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना अद्याप पूर्ण क्लीन चिट देण्यात आलेली नाही. कूपर रुग्णालयाच्या अहवालाची आणखी सविस्तरपणे तपासणी होणार असल्याचे सांगितले जाते आहे. कूपर रुग्णालय अजूनही प्रश्नांच्या घेऱ्यात अडकले आहे.

एम्सच्या अहवालानुसार, सुशांत प्रकरणात कूपर रुग्णालयाने निष्काळजीपणा केला आहे. सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. कूपर रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात, सुशांतच्या गळ्यावरील खुणांबाबत काहीही नमूद केलेले नसून, सुशांतच्या मृत्यूची वेळही नमूद केलेली नव्हती.

आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू होणार?

एम्सचा अहवाल मिळाल्यानंतर आता सीबीआय आत्महत्येचा मुद्दा लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. म्हणजेच पुढील तपासात, सुशांतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली असेल तर त्याचे कारण काय होते? त्याला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले? त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय?, या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत.

या प्रकरणी सुशांतचा लॅपटॉप, हार्ड डिस्क, कॅनन कॅमेरा आणि दोन मोबाईल सीबीआयने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आल्याने, ती चौकशीच्या घेऱ्यात अडकली आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तीनही संस्थांकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगलमध्येही रियाचे नाव आल्याने एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली आहे.

(AIIMS forensic panel rules out murder claims in Sushant Singh Rajput Case)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें