नितीन गडकरींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं ओबीसी कार्ड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नागपूर : महाराष्ट्राच्या उपराजधानीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले या बीग फाईटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याने नागपुरात नितीन गडकरींचं पारडं जड आहे. त्यामुळेच भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनेही नागपुरात नाना पटोलेंच्या रुपाने ओबीसी कार्ड खेळलंय. नागपूर लोकसभा मतदारसंघ… देशात भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघापैकी एक… पूर्वी […]

नितीन गडकरींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं ओबीसी कार्ड
Follow us on

नागपूर : महाराष्ट्राच्या उपराजधानीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले या बीग फाईटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याने नागपुरात नितीन गडकरींचं पारडं जड आहे. त्यामुळेच भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनेही नागपुरात नाना पटोलेंच्या रुपाने ओबीसी कार्ड खेळलंय.

नागपूर लोकसभा मतदारसंघ… देशात भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघापैकी एक… पूर्वी नागपूर हा काँग्रेसचा गड होता. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नागपूरचा हा गड काबिज केला. सध्या नागपूर लोकसभा मतदारसंघात सहापैकी सहाही आमदार भाजपचे आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने संघाचं नेटवर्क आणि नितीन गडकरींनी केलेली कामं…. यामुळे सध्या नागपूर भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. पण भाजपच्या या बालेकिल्ल्याला हादरे देण्यासाठी काँग्रेसने ओबीसी कार्ड खेळलंय.

नागपूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 26 हजार मतदार आहेत. यापैकी जवळपास 45 टक्क्यांच्या आसपास ओबीसी मतदारांची संख्या आहे. त्यामुळेच नाना पटोलेंच्या रुपाने काँग्रेसने नागपुरात ओबीसी कार्ड खेळलंय. त्याच दिशेने भाजपच्या विरोधात काँग्रेसने प्रचारही सुरु केलाय.

काँग्रेस जातपात मानत नाही, असं नाना पटोले म्हणत असले तरीही ओबीसी आणि बहुजन असल्याचं ते सांगायला विसरत नाही. पण भाजपला मात्र काँग्रेसच्या या ओबीसी कार्डची चिंता दिसत नाही. ‘नितीन गडकरी यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, त्यांनी सर्व समाजाची कामं केलीत, त्यामुळे याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, आणि ओबीसी समाजही नितीन गडकरींवर प्रेम करतो, असं म्हणत या निवडणुकीत नितीन गडकरी पाच लाख मतांनी जिंकण्याचा विश्वास, भाजप प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.

नागपूर लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती-जमाती, मुस्लीम आणि ओबीसी या समाजाची निर्णायक मतं आहेत. पण गेल्या काही वर्षात हे तिन्ही घटक वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले. यातला एक वर्ग भाजप सोबतही आहे, तर काही काँग्रेस आणि काही बसपासोबतही.. पण या निवडणुकीत काँग्रेसने बऱ्याच वर्षानंतर नागपुरात ओबीसी उमेदवार दिलाय. त्यामुळेच नागपुरात आपली पत राखण्यासाठी काँग्रेस ओबीसी कार्ड खेळण्याची कुठलीही कसर सध्या सोडत नाही.