हिटलर की मौत मरेगा मोदी, दिल्लीतल्या आंदोलनात काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांचं वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Jun 20, 2022 | 4:14 PM

सहाय म्हणाले की, आमची दोन-तीन निवडून आलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपने केले आहे. मदारीच्या रूपाने आलेले मोदी या देशाचे पूर्ण हुकूमशा झाले आहेत.

हिटलर की मौत मरेगा मोदी, दिल्लीतल्या आंदोलनात काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांचं वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : देशात अग्निपथ योजनेवरून (Agneepath Yojana) देशातील 13 राज्यात सार्वजिक मालमत्तेचे नुकसान केलं जात आहे. देशातील तरून पिढी सैन्यात भरती होण्यासाठी रांत्रदिवस प्रयत्न करत असतानाच या योजनेची घोषणा होते. आणि तरून रस्त्यावर उतरतात. चक्काजाम केला जातो आणि रेल्वे जाळल्या जात आहेत. अशातच देशातील विविध विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर हल्ला बोस केला जात आहे. तसेच तरूणांचे भविष्य आणि त्यांची मागणी लक्षात घेत अग्निपथ योजना मागे घ्या अशी मागणी होत आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय (Congress Leader Subodh Kant Sahay) यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधादरम्यान सुबोधकांत सहाय म्हणाले की, पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) हिटलरच्या मार्गावर आहेत आणि ते हिटलरच्या मृत्यूने मरतील. ते म्हणाले, हिटलरनेही अशी संघटना बनवली होती, तिचे नाव खाकी होते. त्याने ही संघटना लष्कराच्या मधोमध बनवली होती, मोदींनी हिटलरचा मार्ग अवलंबला तर हिटलर प्रमाणे मरतील. हे मोदींनी लक्षात ठेवावे.

सरकारे पाडण्याचे काम

यापूर्वी सहाय म्हणाले की, आमची दोन-तीन निवडून आलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपने केले आहे. मदारीच्या रूपाने आलेले मोदी या देशाचे पूर्ण हुकूमशा झाले आहेत. मला वाटतं त्यांनी हिटलरचा सगळा इतिहास ओलांडला आहे.

आपल्या वक्तव्यावर खुलासा

मात्र, सुबोधकांत सहाय यांनी लगेचच आपल्या वक्तव्यावर खुलासा केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तर त्यांच्या धोरणांवर प्रश्न विचारले जातील, असेही ते म्हणाले. त्यांच्या धोरणांमुळे आज देश पेटला आहे, असे माजी केंद्रीय मंत्री म्हणाले. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे नरेंद्र मोदींच्या अग्निपथ योजनेचा बचाव तिन्ही लष्करप्रमुखांना करावा लागला. मात्र सरकार लष्करप्रमुखांना ढाल बनवत आहे. हिटलरच्या वक्तव्यावर सुबोधकांत सहाय म्हणाले की, ‘हिटलरने खाकी असलेली संघटना तयार केली होती आणि ते त्याच्याच पावलांवर चालत आहेत. ते म्हणाले की, ही एक म्हण आहे आणि म्हण आहे की जो हिटलरची चाल चालेल…’

काँग्रेसने हे वक्तव्य लावले धुडकावून

त्याचवेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या वक्तव्यावरून काँग्रेसशी याचा काही संबंध नसल्याचे म्हटलं आहे. तर मोदी सरकारच्या हुकूमशाही विचारसरणी आणि जनविरोधी धोरणांविरुद्ध काँग्रेस पक्ष लढा देत राहील, असेही ते म्हणाले. पण पंतप्रधानांबद्दल कोणत्याही अशोभनीय टिप्पणीशी आम्ही सहमत नाही, गांधीवादी तत्त्वे आणि पद्धतींवर आमचा संघर्ष सुरू राहील असेही पक्षाने म्हटलं आहे.