राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून ‘टोल वसुली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, फडणवीसांचंही प्रत्युत्तर

| Updated on: Mar 04, 2021 | 2:24 PM

एका व्यक्तीनं आपली भेट घेतली आणि राम मंदिरासाठी निधी देण्याबाबत आपल्याला त्रास दिला जात असल्याचं त्या व्यक्तीने सांगितल्याचं नाना पटोले म्हणाले.

राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून टोल वसुली, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, फडणवीसांचंही प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरात निधी संकलन अभियान राबवलं जात आहे. या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. एका व्यक्तीनं आपली भेट घेतली आणि राम मंदिरासाठी निधी देण्याबाबत आपल्याला त्रास दिला जात असल्याचं त्या व्यक्तीने सांगितल्याचं नाना पटोले म्हणाले. तसंच तुम्ही हिंदू असताना त्यांना उत्तर का दिलं नाही? असा प्रश्नही आपण त्या व्यक्तीला केल्याचं पटोले म्हणाले.(Criticism of Nana Patole on BJP’s campaign for fund raising of Ram Mandir)

‘भाजपवालेच हा टोल जमा करत आहेत का?’

विधानसभेत बोलताना पटोले यांनी भाजपवर एकावर एक आरोप केले. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असताना आपण काल सभागृहात नव्हतो. पण काल भाजप नेत्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पटोले यावेळी म्हणाले. सभागृहात पटोले बोलत असताना त्यांच्या अनेक शब्दांवर आणि भूमिकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.

सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं. सभागृहात मी राम मंदिराच्या नावानं सुरु असलेल्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. मग भाजपवालेच हा टोल जमा करत आहेत का? असा खोचक सवाल पटोले यांनी केलाय.

’30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला?’

दरम्यान, सभागृहात बोलताना पटोले यांनी राम मंदिराच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केला असता, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. जे लोक खंडणी गोळा करतात, त्यांना समर्पण काय समजणार, असा टोला फडणवीसांनी लगावला. फडणवीसांच्या खंडणीखोर या मुद्द्यावर बोलताना भाजप शिवसेनेला खंडणीखोर म्हणत असेल तर त्यांनी आधी सांगावं की राम मंदिरासाठी गोळा केला जाणार पैसा कोणत्या चॅरिटी ट्रस्टकडून घेतले जात आहेत ते त्यांनी सांगावं, असं आव्हान पटोले यांनी दिलंय. त्याचबरोबर 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा, असंही पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या :

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव, जर प्रस्ताव सिद्ध झाल्यास शिक्षा काय?

‘त्या’ महिलेनेच अंगातील झगा काढला, गृहमंत्र्यांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात त्यादिवशी नेमकं काय घडलं?

Criticism of Nana Patole on BJP’s campaign for fund raising of Ram Mandir