
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले असून 27 वर्षांनतर राजधानीत कमळ फुललं आहे. भाजपची विजयी वाटचाल असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. धक्कादायक म्हणजे अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदान केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता भाजपचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
राहुल गांधी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी 2029 च्या विधानसभेत माझ्याशी सामना करावा, असे खुले आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना दिला. दिल्लीकरांनी आप पक्षाला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले आहे. आता ईव्हीएम मशीन सेट होती, असा आरोप काँग्रेस आणि संजय राऊत करायला सुरुवात करतील. अशी खोचक टीका त्यांनी केली.
नांदेडच्या आश्रम शाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. शाळेतील २० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेडमध्ये पिकअप – टाटा मॅजिकचा अपघात झाला. या अपघातात अकरा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटा मॅजिकचा वाहनचालक गंभीर जखमी आहे.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिल्ली निकालावर मत मांडत केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ” दिल्लीकर हे केजरीवाल यांच्या सत्तेला कंटाळले होते.दिल्लीकरांचे आश्वासन केजरीवालांनी पूर्ण केले नाही.पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहांवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. भारतातील दिल्ली हे केंद्रबिंदू आहेत या ठिकाणी भाजपचा विजय होणे याचा आनंद आहे. काँग्रेसचा सगळीकडे सपाया होत चाललाय.”असं म्हणतं त्यांनी टोले लगावले आहेत.
हितेंद्र ठाकूर आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. मात्र आता ठाकूर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, ” विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतरपासून त्यांची जीवदानी देवीचे दर्शन घेण्याची त्यांची इच्छा होती. मिलिंद नार्वेकर यांनी जीवदानीचे दर्शन घेतले तसेत जाताना मला भेटून गेले आहेत याचे वेगळे काही औचित्य नव्हते” असं म्हणत त्यांनी या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजधानी दिल्लीचा सर्व बाजूंनी विकास करू आणि लोकांचे जीवन विकासाकडे नेण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.
दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत आपचा दारूण पराभव केला आहे. या नंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभव स्वीकारला आहे. तसेच जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचं म्हंटलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे आचरण, विचार आणि चारित्र्य शुद्ध असले पाहिजे. दारुमुळे त्यांची प्रतिमा खराब होती, त्यामुळे त्यांना कमी मते मिळाली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया येथून निवडणूक हरले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग विजयी झाले आहेत.
सर्वात मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ‘आप’टले; दिल्लीत मोठा पराभवhttps://t.co/dbEPvaBiXn #NewDelhi #ArvindKejriwal
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2025
दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का बसला आहे. मनोज सिसोदियांचा पराभूत झाले आहेत. जंगपूर विधानसभा मतदारसंघातून मनीष सिसोदियांचा पराभव झाला आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15-18 वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यातून देशात सत्ता पालट झाली. काँग्रेस सत्तेतून गेली. भाजपाने मांड ठोकली. दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णा उतरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवलं. केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसवण्यात अण्णा यशस्वी ठरले.
दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर या विजयाचे श्रेय कुणाला द्यायचे याची चर्चा होत आहे. पक्षातील नेते त्यांच्या आवडीचा नेता मुख्यमंत्री पदी असावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांनी कार्यकर्त्यांना थोडासा संयम बाळगा असे आवाहन केले आहे.
दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 28 जागांवर पुढे आहे. काँग्रेसच्या खात्यात एकही मत गेलेले नाही.
दिल्लीत आप सत्तेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. जनता भाजपाला मतदान करत नसल्याचे ते म्हणाले. मतदान घोटाळ्याचा महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत डबल इंजिन सरकार अस्तित्वात येत आहे. सर्व काही फुकट देऊन विजय मिळवता येतो, या विचाराला मतदारांनी चोख उत्तर दिल्याचे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले. दिल्लीतील निकालाचे सकारात्मक परिणाम बिहारच्या निवडणुकीवर दिसतील असे ते म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याचे कलावरून स्पष्ट होत आहे. आम आदमी पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आर एस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडून एक दिवा त्यागाचा उपक्रमातून साजरी करण्यात आली जयंती… डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला परिसर… रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हजारो महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला… दीपोत्सवाद्वारे रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
और लढो आपस में, ओमर अब्दुलांची पोस्ट सध्या तुफान चर्चेत… ओमर अब्दुलांचा काँग्रेस आणि आपला टोला… दिल्ली आपच्या हातून गेली?, इंडिया आघाडीत बिघाडी…
निवडणूक आयोगाच्या आकडेवाडीनुसार भाजप 24 आणि आप 6 जागांवर पुढे… 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं… मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे…
येत्या एप्रिल महिन्यात त्याची जाहिरात काढून त्यात नर्सरीमध्ये २० आणि ज्युनियर केजीमध्ये २० विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे… भाईंदर पूर्व इंद्रलोक मधील शाळा इमारतीचे बांधकाम या वर्षी पूर्ण झाली आहे..
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला दिल्लीत बहुमत मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची संपूर्ण टीम कोलमडली आहे. ती पिछाडीवर आहे. तसेच काँग्रेसची कामगिरी पुन्हा निराशाजनक दिसत असून अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
दिल्लीत पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप आणि भाजप यांच्यात कांटे की टक्कर दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसचे खाते अद्याप उघडले नाही. जंगपुरा मतदारसंघातून आपचे उमेदवार मनीष सिसोदिया पिछाडीवर असून तसेच नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल आणि कालकाजी मधून आतिषी या पिछाडीवर आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बुरारी आणि देवालीमध्ये ‘आप’ पुढे आहे, तर पडपडगंजमध्ये भाजप आघाडीवर आहे.
ही काही सामान्य निवडणूक नव्हती , हा तर दुष्ट आणि चांगल्या यांच्यातील लढा होता. दिल्लीची जनता पुन्हा आप आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभी राहील आणि ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील असा विश्वास आतिषी यांनी व्यक्त केला.
#WATCH | Delhi CM Atishi and AAP candidate from Kalkaji, Atishi says, “This was not an ordinary election but a fight between good and evil. I am confident that the people of Delhi will stand with the good, AAP and Arvind Kejriwal. He will become the CM for the fourth time…” pic.twitter.com/Bv9UQLWNCB
— ANI (@ANI) February 8, 2025
“जसा देश विकसित भारत बनत आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतही कमळ फुलणार आहे. आपची हॅटट्रिक होणार नाही. ” असे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते आणि मालवीय नगरचे उमेदवार सतीश उपाध्याय म्हणाले
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. या निकालाच्या ट्रेंडवरून, पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आप आणि काँग्रेसने सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उभे केले, तर भाजपने 68 जागा लढवल्या आणि जनता दल (युनायटेड) आणि लोकतांत्रिक जनशक्ती पार्टी (रामविलास) या मित्रपक्षांसाठी दोन जागा सोडल्या.
एकूण 699 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात 603 पुरुष, 95 महिला आणि थर्ड जेंडर मेदवार आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकूण 60.5% मतदान झालं.
दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणूक लढतीचा निकाल काही तासांतच लागणार आहे. 1998 पासून विरोधी पक्ष असलेल्या सत्ताधारी आप आणि भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे, परंतु काँग्रेसही काही अनपेक्षित निकालांसह ही लढत बदलू शकते. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि 9.30 पर्यंत सुरुवातीचा कल येणं अपेक्षित आहे.